नव विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले, एकाच घरातली खुनाची दुसरी घटना

नव विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले, एकाच घरातली खुनाची दुसरी घटना

सासूच्या सांगण्यावरून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जीवंत पेटवून दिले. यात ती 80 टक्के भाजली होती.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 04 डिसेंबर : घरगुती कारणावरून विवाहित महिलेचे हातपाय बांधून जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडल्याचं पुढे आलंय. दोन दिवसांपूर्वी या विवाहितेला जाळण्यात आलं होतं. त्यात ती 80 टक्के भाजली होती. त्या पीडीत महिलवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान आज पहाटे तिची प्राणज्योत मालवली. या महिलेचा तहसीलदार व पोलिसांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदवला असून ‘मला सासरच्यांनी जाळले’, असे महिलेने जबाबात म्हटले आहे. ऋतुजा भास्कर बिटे (वय 19) असे मृत महिलेचे नाव आहे. वडवणी तालुक्यातील साळींबा येथे या महिलेचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले, मात्र त्यानंतर सासरच्यांनी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. सासू ऋतुजाला नेहमीच टोचून बोलायची व तिचा छळ करायची.

ठाकरे सरकारमध्ये मानापमानाचं नाट्य, बाळासाहेब शासकीय बंगाल्याच्या प्रतिक्षेत

यातून सासूच्या सांगण्यावरून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जीवंत पेटवून दिले. यात ती गंभीररित्या भाजलेल्या ऋतुजावर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती भास्कर प्रल्हाद बिटे व सासू रुक्मीन प्रल्हाद बिटे या दोघांना वडवणी पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

देवेंद्र फडणवीस सोडणार वर्षा बंगला, नवा पत्ता ठरला!

खुनाची यांच घरातील ही दुसरी घटना

काही वर्षापुर्वी याच घरातील मुलगी प्रियकराबरोबर बीड येथे चित्रपट पाहण्यासाठी गेली होती म्हणून बापाने तिला जिवंत मारुन टाकले होते. या प्रकरणात वडिलांविरुध्दात  302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता याच घरातील सुनेला नवरा व सासूने अंगावर  रॉकेल टाकून पेटवून दिले आहे. यात नवरा व सासू विरुध्दात 302चा गुन्हा दाखल झाला आहे ही या घरात दुसरी घटना असल्याने संताप व्यक्त केला जातोय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 4, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading