मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बंदुकीसोबत सेल्फी घेताना गोळी लागून नवविवाहितेचा मृत्यू, वडिलांच्या विधानानं प्रकरणाला नवं वळण

बंदुकीसोबत सेल्फी घेताना गोळी लागून नवविवाहितेचा मृत्यू, वडिलांच्या विधानानं प्रकरणाला नवं वळण

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

पीडितेचे सासरे राजेश गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं, की राधिकाचं लग्न मे 2021 मध्ये त्यांचा मुलगा आकाश गुप्ता याच्यासोबत झालं होतं. मात्र, पीडितेच्या वडिलांनी हा संपूर्ण कट असल्याची शंका व्यक्त केली

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 25 जुलै : सेल्फी (Selfie) घेताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री आपल्या सासऱ्याच्या सिंगल बॅरल गनसोबत सेल्फी (Selfie With Gun) घेण्याच्या प्रयत्नात असतानाच गोळी लागून 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा बंदुक लोड केलेली होती आणि महिलेनं सेल्फी घेण्यासाठी ट्रिगरवर आपलं बोट ठेवलं. ही गोळी थेट महिलेच्या मानेवर लागली. महिलेला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोई इथे घडली आहे.

पत्नीने चौथ्या मजल्यावरुन पतीला दिला धक्का; मात्र तरुण पोलिसांना म्हणाला...

पीडितेचे सासरे राजेश गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं, की राधिकाचं लग्न मे 2021 मध्ये त्यांचा मुलगा आकाश गुप्ता याच्यासोबत झालं होतं. मात्र, पीडितेच्या वडिलांनी हा संपूर्ण कट असल्याची शंका व्यक्त केली आणि याबाबत पोलिसांत तक्रारही दिली आहे. राजेश गुप्ता यांनी सांगितलं, की आमचं एक लहान ज्वेलरीचं दुकान आहे. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास माझा मुलगा आकाश आमची गन परत घेऊन आला. जी ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा केली होती. ही बंदुक दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये ठेवण्यात आली होती, जिथे राधिका होती. राधिका त्या बंदुकसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होती.

पुन्हा कोरोनाची लक्षण जाणवू लागली म्हणून मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

ते पुढे म्हणाले, की सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आम्हाला गोळीचा आवाज आला आणि आम्ही वरच्या रूमकडे धाव घेतली. इथे गेल्यावर दिसलं की राधिकाला गोळी लागली होती. यानंतर तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यादरम्यान फोनचा कॅमेरा सेल्फी मोडमध्ये स्विच ऑन आढळला. शाहाबादचे एचएचओ शिवशंकर सिंह यांनी सांगितलं, की संबंधित गन आणि महिलेचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. ते म्हणाले, की आम्हाला पीडितेच्या फोनमध्ये बंदुकीसोबतचा एक फोटो आढळून आला आहे. जो मृत्यूच्या काही सेकंद आधीच क्लिक करण्यात आला होता. महिलेच्या शरीरावर गोळीशिवाय इतर कोणतीही जखम आढळून आली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Selfie