मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नानंतर 8 महिन्यातच विवाहितेनं घेतला जगाचा निरोप; 'त्या' शेवटच्या व्हिडिओमुळे मोठा खुलासा

लग्नानंतर 8 महिन्यातच विवाहितेनं घेतला जगाचा निरोप; 'त्या' शेवटच्या व्हिडिओमुळे मोठा खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आत्महत्या करण्यापूर्वी महिलेनं स्वत:चा व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या माहेरच्या लोकांना पाठवला. या प्रकरणाची माहिती मिळताच गोविंदपुरी पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : जगाने आज भरपूर प्रगती केली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही अशा घटना घडतात ज्या हादरवणाऱ्या असतात. 25 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीतील गोविंदपुरी भागात एका नवविवाहित महिलेनं पतीकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेनं स्वत:चा व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या माहेरच्या लोकांना पाठवला. या प्रकरणाची माहिती मिळताच गोविंदपुरी पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आत्महत्येआधीचा हा व्हिडिओ आणि मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून आरोपी पती अनुपम याला अटक केली गेली. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कथित व्हिडिओमध्ये ती महिला रडताना दिसत आहे. ती म्हणते की "माझं आयुष्य खरंच संपलं आहे, या माणसाने मला घरात एकटं सोडलं आहे. हे लोक मला हुंड्यासाठी खूप मारत आहेत. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा अनुपम जबाबदार आहे, मी त्याच्यामुळेच मरत आहे. मला खूप मारहाण झाली आहे. मला घरात एकटं सोडून तो निघून जातो'.

कोल्हापूर हादरलं! पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितलं की, मृत 27 वर्षीय आरती गुप्ता अलिगढच्या माणिक चौकात तिच्या कुटुंबासह राहत होती. आरतीचं लग्न 30 जानेवारी 2022 रोजी गोविंदपुरीतील हिमगिरी अपार्टमेंटमध्ये राहणारा अनुपम गुप्तासोबत झालं होतं. अनुपम गुप्ता एका खाजगी कंपनीत आर्किटेक्ट म्हणून काम करतो. अनुपमचं कुटुंब मूळचं राजपुरा, उत्तर प्रदेशचं आहे.

डीसीपीने सांगितलं की, आत्महत्येची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना व्हिडिओ दाखवला. आरतीचे वडील गिरीश चंद्र यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीचा लग्नापासूनच तिच्या सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. नवरा तिला अनेकदा मारहाण करून एकटी सोडत असे. तिला माहेरच्या लोकांसोबत बोलूही दिलं जात नव्हतं.

मुलाच्या वादात मध्यस्थी केली, थेट गळा आवळत पित्याचाच खून, यवतमाळेतील धक्कादायक प्रकार

आरती 24 सप्टेंबर रोजी उशिरा गोविंदपुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती, जिथे ती महिला कॉन्स्टेबलला भेटली. तिने सांगितलं होतं की तिच्या पतीने तिला घरी एकटं सोडलं आणि तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. आरतीने पतीचा शोध घेण्यासाठी हवालदाराची मदत घेतली होती. कॉन्स्टेबलने तक्रार देण्यास सांगितलं असता आरतीने नकार दिला. यानंतर कॉन्स्टेबलने आरतीला तिच्या घरी सोडलं आणि काही अडचण असल्यास संपर्क करण्यास सांगितलं.

आरती गुप्ताच्या मामाने सांगितलं की, व्हिडिओमध्ये आरती रडत तिच्या पतीने मारहाण केल्याबद्दल आणि घरात एकटी पडल्याबद्दल बोलत आहे. व्हिडिओ पाठवल्यानंतर आरतीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. व्हिडिओ पाहून घरच्यांनी आरती आणि तिच्या सासरच्या मंडळींना फोन केला असता, त्यांचा फोन कोणी उचलला नाही. माहेरच्या लोकांचं आरतीच्या सासरच्या लोकांशी बोलणं होईपर्यंत तिने आत्महत्या केलेली होती.

First published:

Tags: Crime news, Suicide news