Home /News /crime /

नववधू तिसऱ्याच दिवशी झाली लुटारू, दागिने घेऊन ‘असा’ केला पोबारा

नववधू तिसऱ्याच दिवशी झाली लुटारू, दागिने घेऊन ‘असा’ केला पोबारा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू घरातील दागदागिने लुटून पळून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पतीला जबर धक्का बसला आहे.

    जयपूर, 4 जुलै : लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी (Third Day of Marriage) नववधू घरातील दागदागिने लुटून पळून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पतीला जबर धक्का बसला आहे. एका निवृत्त सैनिकाने (Retired military soldier) पहिली पत्नी वारल्यानंतर मुलांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या नववधूने मुलांना मारहाण करत घरातील पहिल्या पत्नीचे दागिने (Looted and run away) घेऊन पोबारा केला. अशी घडली घटना ही घटना आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधील. रामदयाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करावं, यासाठी कुटुंबीय सतत आग्रह करत होते. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांची मुलगी यांचं पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी त्यांनी घरच्यांना होकार देत लग्न करण्याची तयारी दाखवली. या लग्नासाठी त्यांनी 3 लाख रुपये खर्चही केला. मात्र लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आलेल्या अनुभवाने रामदयाल यांना धक्का बसला. या घटनेनंतरही त्यांनी आपली पत्नी रेखाशी संपर्क साधून तिला परत येण्याची विनंती केली. मात्र घरातून पहिल्या पत्नीचे सुमारे 5 लाख किंमतीचे दागिने घेऊन पळून गेलेल्या रेखाने परत यायला नकार दिला. त्यानंतर मात्र रामदयाल यांनी पोलीस स्टेशन गाठत रेखाविरोधात चोरीची आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. अशी झाली ओळख 30 एप्रिल या दिवशी रामदयाल आणि रेखा यांचं जयपूरमध्ये साध्या पद्धतीनं लग्न झालं होतं. त्यापूर्वी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आपल्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेत असणाऱ्या रामदयाल यांनी बसमध्ये श्याम सुंदर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानं आपल्या पाहण्यात एक मुलगी असून ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे लग्नाचा खर्च तुम्हाला उचलावा लागेल, असं रामदयाल यांना सांगितलं होतं. रामदयाल यांनी ही बाब मान्य करत लग्न करायला तयारी दाखवली. लग्न झाल्यानंतर दोन दिवस रेखा गुण्यागोविंदानं घरी राहिली. मात्र तिसऱ्या दिवशी रामदयाल बाहेर गेल्यानंतर संधी साधत तिनं कपाटात ठेवलेले पहिल्या पत्नीचे दागिने घेतले आणि याबाबत विचारणा करणाऱ्या मुलांना मारहाण करून तिने पोबारा केला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Rajasthan

    पुढील बातम्या