पुणे, 01 जानेवारी : एकीकडे नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत असताना पुण्यात (Pune) गुंडांनी उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरूड (kothrud) परिसरात पहाटेच्या सुमारास काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे नववर्षाच्या (New Year Celebration ) पहिल्या दिवशीच खळबळ उडाली आहे.
पुण्यातल्या कोथरूड परिसरत नवीन वर्षाची सुरुवात टोळीने गाड्या फोडून केली. 1 जानेवारीला रात्री 2 ते 3 च्या दरम्यान लेन नंबर 13 म्हसोबा मंदीर सुतारदरा (कोथरूड) येथे 5 ऑटो रिक्षा,1 स्कूल व्हॅन, 2 पिओगो टेम्पो,1 टू व्हिलर या गाड्या फोडण्यात आल्या. तरक सुतारदऱ्या मध्येच याच टोळक्याने शिवशक्तीनगर लेन नं 27 येथे 2 टू व्हिलर जाळल्या, तर एका फोर व्हिलरच्या काचा फोडल्या.
सदर गाड्या ह्या रस्त्यावरील दगड व ब्लॉक यांच्या सहाय्याने फोडण्यात आल्या. कोथरूड परिसरात गाड्या फोडण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. यामुळे अनेकांच मोठं नुकसान झालं आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कोथरूड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रात्रीची संचारबदी असताना हा प्रकार घडला आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्री दोन वाजता पुणे येथील कंट्रोल रूमला भेट दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच नियंत्रण कक्षात जाऊन काही नागरिकांच्या तक्रारीदेखील गृहमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. एकीकडे गृहमंत्री कंट्रोल रूममध्ये असताना गुंडांनी कोथरूडमध्ये गाड्यांची तोडफोड केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.