मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, पोलीस आता 'त्या' दिशेनं करणार तपास

शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, पोलीस आता 'त्या' दिशेनं करणार तपास

 आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे.  तसंच शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे.

आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे. तसंच शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे.

आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे. तसंच शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे.

  • Published by:  sachin Salve
चंद्रपूर, 2 डिसेंबर : ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांनी आत्महत्या प्रकरणाचा सर्वअंगाने पोलीस तपास करत आहे. आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे.  शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. पण नेमके विष कोणते होते याबाबतचा खुलासा पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात स्पष्ट होणार आहे. मात्र, आजही प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल पोलिसांनी जाहीर केला नाही. शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना,  या दृष्टीने पोलीस शक्यता पडताळून पाहत आहे. त्यामुळे आत्महत्येपूर्वी शीतल आमटे यांनी कुणाशी संवाद साधला, त्यांना कुणाचे फोन आले, त्यांना कोण-कोण भेटली अशी माहिती पोलीस गोळा करत आहे. तसंच, शीतल आमटे या मानसिक तणावाखाली होत्या, त्यामागचं कारण काय होतं, याचा तपासही पोलीस करत आहे. शीतल आमटे यांचा लॅपटॉप,टॅब, मोबाईल जप्त विशेष बाब म्हणजे, डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे. डॉ. शीतल यांनी या गॅजेटचे पासवर्ड नुकतेच बदलले होते व याची माहिती त्यांचे पती गौतम करजगी यांना देखील नव्हती. सॉफ्टवेअर पासवर्ड लॉक असल्याने दिशा मिळणारा तपास खुंटला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही गॅजेटमध्ये डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे पासवर्ड ठेवला असल्याने प्रक्रिया अवघड झाली आहे. डॉ. शीतल यांचे नोकर आणि घरगुती मदतनीस यांची चौकशी करण्यात आली आहे. ते विष कोणते? डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. त्यांनी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली असून याच स्थळी उलटी झालेले कापड देखील पोलिसांनी जप्त केले आहे.त्यांनी नेमके कोणते विष घेतले याबाबत पोस्टमोर्टमच्या रासायनिक अहवालात स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती असून हे विष त्यांनी कुठून मिळविले, याचा शोध पोलीस घेत आहे. शीतल आमटे आणि सामाजिक काम डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं. त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे 'यंग ग्लोबल लीडर 2016' साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते. कौटुंबिक वाद मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.
First published:

पुढील बातम्या