Home /News /crime /

'हुंडा फॉर्च्युनर' प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणाने गाडीला नकार दिल्याची क्लिप समोर

'हुंडा फॉर्च्युनर' प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणाने गाडीला नकार दिल्याची क्लिप समोर

हुंडा फॉर्च्युनर कार प्रकऱणात नवा ट्विस्ट आला आहे. फॉर्च्युनर गाडी मागितल्याचा आरोप ज्या तरुणावर झाला, त्याने काही ऑडिओ क्लिप्स समोर आणल्या आहेत.

    चंदिगढ, 8 डिसेंबर: लग्नाचे विधी सुरू असतानाच नवरदेव आणि त्याच्या वडिलांनी फॉर्च्युनर गाडीची (Demand of fortuner car) मागणी केल्याविरोधात तरुणीने गुन्हा दा (Case filed) खल केल्यानंतर आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट (New twist) आला आहे. तरुणाने आपल्याला गाडीच चालवता येत नसल्याचं सांगत यापूर्वीदेखील आपण गाडी नाकारल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्याने काही पुरावेदेखील सादर केले असून त्यात मुख्यत्वे फोनवरील संभाषणांच्या ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. काय होतं प्रकरण? हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात 20 लाख रुपये आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी वराकडील मंडळींनी केली होती. लग्नाचे विधी सुरु असताना मध्यरात्री त्यांनी ही मागणी होती आणि लग्नाचे विधी थांबवण्यात आले, अशी तक्रार तरुणीने केली होती. फॉर्च्युनर गाडीच्या मागणीसाठी वराकडील मंडळींनी लग्नाचे फेरेदेखील होऊ दिले नाहीत, अशी तक्रार तरुणीने केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तरुणाने दिल्या ऑडिओ क्लिप्स तरुणाने पोलिसांना काही ऑडिओ क्लिप्स सादर केल्या असून त्यात आपण गाडीला स्पष्ट नकार दिल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यातील पहिली क्लिप ही तरुण आणि तरुणीचे वडील यांच्यातील संभाषणाची आहे. त्यात आपल्याला कार चालवता येत नाही आणि आपल्याला कार घेण्याची कुठलीही इच्छा नाही, असं या तरुणानं म्हटलं असल्याचं ऐकू येतं. तर दुसऱ्या क्लिपमध्ये तरुणाचं त्याच्या भावी पत्नीसोबतचं संभाषण ऐकू येतं. त्यात त्यानं आपल्याला कार नको असताना ती  उगीच कशाला देण्यात येत आहे, असा सवाल तरुण विचारत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून पोलीस या ऑडिओ क्लिपची खातरजमा करत आहेत. हे वाचा - अपघातग्रस्त झालेलं Mi-17V-5 हेलिकॉप्टर वायुदलातील सर्वश्रेष्ठ! मध्यरात्री झाला होता वाद सासरच्या मंडळींपैकी अनेकांना चांदीचे शिक्के न मिळाल्यामुळे काहीजण नाराज होते. यावरून रागावलेल्या वराच्या वडिलांनी लग्नात गोंधळ घातला आणि आपल्या पाहुण्यांसमोर मान खाली घालायला लागल्याबद्दल मुलीच्या वडिलांना बोल सुनावले होते. त्यानंतर हे प्रकरण फॉर्च्युनर गाडीच्या मागणीपर्यंत जाऊन हे लग्न मोडलं होतं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Haryana, Marriage

    पुढील बातम्या