नवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद

ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्यै कैद झाली असून तो थरार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे.

ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्यै कैद झाली असून तो थरार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे.

  • Share this:
मुंबई 28 सप्टेंबर: नवी मुंबईतल्या उलवेमध्ये सोमवारी संध्याकाळी तोतया पत्रकाराने गोळीबार केला. आशीष चौधरी असं या भामट्याचं नाव आहे. तुम्ही लॉकडाऊनचे नियम पाळत नाही त्यामुळे 2 हजार रुपये द्या. नाहीतर त्याची बातमी देतो असं सांगून तो पैसे उकळत होता. लाच देण्यास नकार दिल्याने त्याने 1 राउंड फायर केला. उलवे येथील उजाला डेअरीमध्ये ही घटना घडली. आरोपीने 9MM च्या जर्मन बनावटीच्या पिस्तुलाने फायरिंग केली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. न्हावाशेवा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तोतया पत्रकार आशिष चौधरीला अटक करण्यात आली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्यै कैद झाली असून तो थरार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. आशीष चौधरी कोण आहे, त्याच्याकडे पिस्तुल कुठूल आलं, त्याने आधीही काही गुन्हे केलेले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: