Home /News /crime /

Jamtara 2.0: Instagram यूजर आहात? तुमच्या नकळत सेक्स व्हिडिओच्या जाळ्यात ओढतीये 'ही' टोळी

Jamtara 2.0: Instagram यूजर आहात? तुमच्या नकळत सेक्स व्हिडिओच्या जाळ्यात ओढतीये 'ही' टोळी

भसीन यांच्या लक्षात आले की त्यांनी जेव्हा त्यांना इन्स्टाग्रामवर आलेला व्हिडिओ कॉल उचलला त्यावेळी त्यांचा फोटो काढला गेला आणि त्याचा वापर करून दुसऱ्याच्या शरीरावर त्यांचा चेहरा लावून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला

नवी दिल्ली 07 सप्टेंबर : गेल्या काही काळापासून ऑनलाइन फसवणूकीचं (Online Frauds) प्रमाण चांगलंच वाढलं आहे. खोट्या लिंक्स पाठवून बँक खात्याची माहिती मिळवून पैसे काढून घेण्याचे प्रकार सर्रास झाले आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या लोकांना लक्ष्य करून सेक्स व्हिडिओजमध्ये (Sex Videos) त्यांचे चेहरे सुपरइम्पोज करून ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचे प्रकारही वाढल्याचे आढळले आहे. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करून लाखो रुपयांची खंडणी उकळली (Extortion) जाण्याची जणू लाटच आली आहे. एकामागोमाग एक अशा फसवणूकीच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होत आहेत. यामुळे सोशल मीडिया युझर्स विशेषत: इन्स्टाग्रामवर (Instagram) असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण बरीच प्रकरणं इन्स्टाग्राम युझर्सच्या बाबतीत घडल्याचं समोर आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भरतपूर, मथुरा आणि मेवातसारख्या ठिकाणाहून कार्यरत असणारी टोळी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे या भागाला ‘न्यू जमतारा’ (New Jamtara) म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. अशाप्रकारे एकूण किती घटना घडल्या आहेत याची नेमकी आकडेवारी पोलिसांकडे नाही. कारण अनेकांनी घाबरून पैसे देऊन सुटका करून घेतली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू अलीकडेच दिल्ली डिफेन्स कॉलनी (Delhi Defense Colony) पोलीस ठाण्यात भसीन (Bhasin) नामक एका व्यक्तीने अशाप्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार, भसीन यांना इन्स्टाग्रामवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर एका महिलेनं त्यांना डायरेक्ट मेसेज (DM) पाठवला आणि त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर (WhatsApp Number) मागितला. मात्र भसीन तिला ओळखत नसल्यानं त्यांनी तिला नंबर देण्याचे नाकारले. त्यानंतर काही मिनिटांतच तिनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉल (Video Call) करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कॉल्सकडे दुर्लक्ष केले; पण सतत कॉल्स येऊ लागल्यावर भसीन यांनी सातवा किंवा आठवा कॉल घेतला. त्यावेळी दुसऱ्या बाजूला एक नग्न महिला (Nude Woman) अश्लील कृत्य करत होती. भसीन यांना क्षणभर कळलेच नाही काय चालले आहे ते? मात्र हे काहीतरी विचित्र आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी तो कॉल लगेच बंद केला. परंतु, त्यानंतर भसीन यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे फोन आणि मेसेजेस येऊ लागले. त्या सगळ्यांना भसीन कोणाशी तरी सेक्स चॅट (Sex Chat) करत असल्याचा व्हिडिओ मिळाला होता. त्यावेळी भसीन यांच्या लक्षात आले की त्यांनी जेव्हा त्यांना इन्स्टाग्रामवर आलेला व्हिडिओ कॉल उचलला त्यावेळी त्यांचा फोटो काढला गेला आणि त्याचा वापर करून दुसऱ्याच्या शरीरावर त्यांचा चेहरा लावून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला. ज्यामध्ये भसीनच व्हिडिओ कॉलमध्ये सेक्स चॅट करत असल्याचे दिसले. यालाच चेहरा सुपरइम्पोज करणं म्हणतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भसीन यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. ...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून आग्रा सायबर पोलिसांनी (Agra Cyber Police) 4 जुलै रोजी मेवातमधील (Mewat) तीन लोकांना अटक केली होती. हे तिघेही लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी न्यूड व्हिडिओ कॉल करण्यासह विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये सामील होते. याच टोळीने भसीन यांना फसवले असावे, असा विश्वास पोलिसांना आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू असून, अशाप्रकारे फसवणूकीचे प्रकार वाढत असल्यानं लोकांनी सावध राहावं असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
First published:

Tags: Cyber crime, Instagram

पुढील बातम्या