RSS कार्यकर्ता म्हणून नाही तर पैशाच्या कारणांमुळे झाली हत्या, तिहेरी हत्याकांडाला नवं वळण

RSS कार्यकर्ता म्हणून नाही तर पैशाच्या कारणांमुळे झाली हत्या, तिहेरी हत्याकांडाला नवं वळण

बंधुप्रकाश पाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याने त्याची हत्या झाली, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला होता. पण आता आर्थिक गैरव्यवहारामुळे त्याचा खून झाला, असं समोर आलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 15 ऑक्टोबर : पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडाबदद्ल एक नवा खुलासा समोर आला आहे. मुर्शिदाबादमधल्या जिआगंज मोहल्ल्यात एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या करण्यात आली होती. बंधु प्रकाश पाल, त्याची गरोदर पत्नी ब्युटी पाल आणि आंगन पाल यांचा खून करण्यात आला होता. या हत्येला राजकीय वळण लागलं होतं.

बंधुप्रकाश पाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याने त्याची हत्या झाली, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला होता. पण आता मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी याचा इन्कार केला आहे.

सीआयडीच्या म्हणण्यानुसार, ही हत्या व्यक्तिगत कारणांमुळे झाली आहे. बंधु प्रकाश पाल हा बेकायदेशीररित्या एफडी योजना चालवत होता. पोलिसांना त्याच्या घरी पासबुकही मिळाली आहेत. ही योजना चिटफंडसारखी होती पण यामध्ये रक्कम कमी होती. यामध्य गरीब लोकच खातं उघडत होते. या प्रकरणी पोलिसांनी उत्पल बेहारा नावाच्या एका संशयिताला पकडलं आहे.

(हेही वाचा : Air Indiaने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी;तर या विमानतळावरून उड्डाण होणार नाही)

बंधु पाल आधी शहापूर गावात उत्पल बेहाराच्या घराजवळच राहत होता. नुकतंच त्याने जिआगंज भागात आपलं घर हलवलं होतं. शहापूरमध्ये असताना बंधुप्रकाश पाल याने उत्पलला फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायला सांगितलं होतं. अनेक वेळा पैसे मागूनही बंधुप्रकाश पैसे द्यायला तयार नव्हता. 5 ऑक्टोबरला उत्पल बंधुप्रकाशच्या घरी गेला होता. त्यावेळी बंधुप्रकाशने त्याला मारपीट केली, असा उत्पलचा दावा आहे.

हे सगळं झाल्यानंतर 8 ऑक्टोबरला उत्पल पुन्हा बंधुच्या घरात घुसला आणि त्याने बंधु, त्याची पत्नी आणि मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. उत्पल बेहाराने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला बंधुप्रकाशच्या घरी जाताना काही शेजाऱ्यांनी पाहिलंही होतं. सीआयडीच्या या तपासामुळे या हत्येचा उलगडा झाला.

==================================================================================

VIDEO: ...म्हणून मुंबईत नारायण राणेंचा भाजपमध्ये होऊ शकला नाही प्रवेश

Published by: Arti Kulkarni
First published: October 15, 2019, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading