Home /News /crime /

नात्याला काळीमा! पुतण्याने केला चुलतीवर बलात्कार, VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल

नात्याला काळीमा! पुतण्याने केला चुलतीवर बलात्कार, VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल

File Photo

File Photo

पुतण्यानंच चुलतीवर बलात्कार करून नात्याला (Nephew raped his aunty and made video of the incident) काळीमा फासल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

    रांची, 23 सप्टेंबर : पुतण्यानंच चुलतीवर बलात्कार करून नात्याला (Nephew raped his aunty and made video of the incident) काळीमा फासल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. शेतात गेलेल्या महिलेचा पाठलाग करत एक तरुण तिथे पोहोचला आणि त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओदेखील त्याने स्वतःच्या (Shot video to blackmail woman) मोबाईलमध्ये शूट केला. शेतात केली जबरदस्ती झारखंडमधील धनबादमध्ये एका विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे ही महिला शेतात भाजी तोडायला गेली होती. तिच्या पाठोपाठ एक तरुण तिथे पोहोचला आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला आणि घटनेची वाच्यता केल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेला जबर धक्का नात्याने पुतण्या लागणारा हा तरुण आपल्यासोबत असं काही करेल, याची पुसटशी कल्पनादेखील आली नाही, अशी प्रतिक्रिया महिलेनं दिली आहे. हा तरुण येताजाता आपल्यावर लक्ष ठेऊन असे. सतत आपल्याकडे तो निरखून पाहत असे. मात्र नात्यातील तरुण असल्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र तरुणाने नात्याला काळीमा फासत महिलेवर बलात्कार केला. हे वाचा - पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सेक्स वर्कर तरुणीला घेरलं; धक्कादायक VIDEO पोलिसांत तक्रार दाखल महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच या तरुणाला पकडून कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. कुटुंबातीलच व्यक्तीने असं लाजीरवाणं कृत्य केल्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Jharkhand, Rape

    पुढील बातम्या