मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नात्याला काळीमा फासणारी घटना, मावशीच्या मुलीसोबत संबंध, घरी समजताच केलं भयानक

नात्याला काळीमा फासणारी घटना, मावशीच्या मुलीसोबत संबंध, घरी समजताच केलं भयानक

बिहारमधील समस्तीपूर येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

बिहारमधील समस्तीपूर येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

बिहारमधील समस्तीपूर येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

मुकेश कुमार (समस्तीपूर), 30 मार्च : बिहारमधील समस्तीपूर येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील शिवसिंगपूर गावात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या त्या महिलेच्या भाच्यानेच केली असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासातं पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बबिता देवी असे मृत महिलेचे नाव आहे.

जमिनीच्या वादातून या खून झाल्याची चर्चा असली तरी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. समस्तीपूरचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांनी सांगितले की, महिला हत्येचा तपास मोहिउद्दीन नगर पोलीस स्टेशन अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केला.

एकतर्फी प्रेमात वेडा झाला शिक्षक, नकार मिळाला म्हणून केलं भयानक कृत्य

यामध्ये आरोपी धीरज गिरी याचे मृत बबिता देवी यांच्या मुलीसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच हा खून झाल्याची घटना घडली. मात्र, 27 मार्च रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर मोहिउद्दीन नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अन् याबाबत तपास सुरू झाला.

पोलीस ठाण्याचे अधिकारी गौरव प्रसाद यांनी कारवाई करताना पुराव्याच्या आधारे मुख्य आरोपी धीरज गिरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीत सांगितले की, मृत बबिता देवी माझी मावशी आहे. सुमारे तीन वर्षांपासून माझे त्यांच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. आम्ही दोघे सतत मोबाईलवरून गप्पा मारत होतो. एवढेच नाही तर 2021 मध्ये मोरवा मंदिरात आम्ही लग्न केल्याची त्याने कबुली दिली. कोणालाही माहिती न देत घरात गुपचूप ते पती-पत्नीसारखे राहू लागले.

नांदेडमध्ये भीषण अपघात; 4 ठार, 6 जखमी, मृतांमध्ये बाळाचा समावेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेला आपल्या मुलीचे कृत्य समजले तेव्हा तिने सार्वजनिक लाजेमुळे मुलीला बहिणीच्या घरी पाठवले. दरम्यान, 4 फेब्रुवारी रोजी पुन्हा तीला घरी बोलवण्यात आले.  यावेळी भांडणात एकमेकांवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.

यानंतर पुन्हा आपल्या मुलीला बहिणीच्या घरी पाठवले. दरम्यान, आरोपीला वाटले की, आपली मावशी माझ्या प्रेयसीला 5 एप्रिल रोजी गुजरात किंवा मुंबईला पाठवू शकते, म्हणून त्याने ही हत्या केली असल्याची माहिती उघड झाली आहे. मोहिउद्दीन नगर पोलिसांनी आरोपी धीरज गिरी याला न्यायालयात हजर केले असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Local18