मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! पाळीव कुत्र्याला ते नाव देणं पडलं महागात; शेजाऱ्यांनी महिलेला जिवंत जाळलं

धक्कादायक! पाळीव कुत्र्याला ते नाव देणं पडलं महागात; शेजाऱ्यांनी महिलेला जिवंत जाळलं

Representative Image

Representative Image

नीताबेन सरवैया (Neetaben Sarvaiya) यांनी आपल्या श्वानाचं नाव सोनू ठेवलं होतं (Dispute Over Dog Name). योगायोगाने नीताबेन सरवैया यांच्या शेजारणीचं नावही हेच होतं.

  • Published by:  Kiran Pharate
अहमदाबाद 22 डिसेंबर : नुकतीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेला केवळ यासाठी आगीच्या हवाली करण्यात आलं कारण तिने आपल्या कुत्र्याचं नाव सोनू ठेवलं होतं (Neighbors Burned the Woman Alive). या घटनेत महिला गंभीररित्या भाजली आहे. 35 वर्षीय नीताबेन सरवैया यांच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना गुजरातमधील असून या प्रकरणातील आरोपी महिलेचे शेजारीच आहेत. डोळ्यावर स्कार्फ बांधून उच्चशिक्षित तरुणीची इमारतीवरून उडी,पुण्यातील घटनेने खळबळ मिळालेल्या माहितीनुसार, नीताबेन सरवैया (Neetaben Sarvaiya) यांनी आपल्या श्वानाचं नाव सोनू ठेवलं होतं (Dispute Over Dog Name). योगायोगाने नीताबेन सरवैया यांच्या शेजारीच राहणाऱ्या सुराभाई भारवाड यांच्या पत्नीचं नावही सोनूच आहे. हीच बाब सुराभाईला खटकली आणि त्याने हे राक्षसी कृत्य केलं. सुराभाईने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून हे धक्कादायक कृत्य केलं. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. फक्त नावासाठी कोणी एवढं विचित्र कृत्य कसं करू शकतं, असा प्रश्न लोकांना पडला आहे. नीताबेन यांचा पती आणि दोन मुलं सोमवारी दुपारी काहीतरी कामानिमित्त घरातून बाहेर गेले होते. नीताबेन घरी आपल्या लहान मुलासोबत होत्या. संधी मिळताच सुराभाई भारवाड आणि त्याचे पाच साथीदार नीताबेन यांच्या घरात शिरले. पोलिसांनी सांगितलं की घरात शिरताच या लोकांनी नीताबेन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि कुत्र्याचं नाव सोनू ठेवल्याने बरंच सुनावलं.

पाळीव कुत्र्याला धडक देणं महागात, कोर्टाकडून 3 लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश

नीताबेनने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या किचनमध्ये निघून गेल्या. यानंतर तीन लोक किचनमध्ये शिरले आणि नीताबेन यांच्यावर केरोसिन शिंपडून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. काहीच वेळात नीताबेन यांचे पती घरी पोहोचले. यानंतर ही आग विझवण्यात आली. नीताबेन यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की नीताबेन आणि आरोपींमध्ये याआधीही अनेकदा पाण्याच्या सप्लायवरुन भांडणं झाली आहेत. या घटनेत सहा जणांविरोधात केस दाखल करण्यात आली आहे.
First published:

Tags: Crime news, Owner of dog

पुढील बातम्या