राष्ट्रवादीच्या रेखा जरे प्रकरणाला नवे वळण, मुख्य साक्षीदाराने केला नवा खुलासा

राष्ट्रवादीच्या रेखा जरे प्रकरणाला नवे वळण, मुख्य साक्षीदाराने केला नवा खुलासा

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार, ज्या हत्येच्या वेळी रेखा जरे यांच्यासोबत कारमध्ये होत्या, त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 06 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare) हत्या प्रकरणी आता पोलीस तपासातून वेगवेगळे खुलासे होत आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराने आपल्या जीवाला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणीच केली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी पत्रकार आणि संपादक असलेल्या बाळासाहेब बोठे याने सुपारी दिली असल्याची कबुली दिल्यामुळे खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळासाहेब बोठे हा फरार झाला आहे.  आता या प्रकरणातील मुख्य साक्षीदार, ज्या हत्येच्या वेळी रेखा जरे यांच्यासोबत कारमध्ये होत्या, त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

हा रस्ता मला छळतो, गुन्हा दाखल करा; औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार

माझ्या जीवाला आरोपींकडून धोका आहे. काही पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही फरार झाली नाही. प्रकृती ठीक नसल्यामुळे विश्रांती घेतली होती. त्यामुळे मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पण काहीजण मला जाणीव पुन्हा पूर्वक बदनाम आहे, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असंही त्यांनी सांगितले.

काय घडलं त्या दिवशी?

मुख्य साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार,  'रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. त्या दिवशी त्यांच्या कारमध्ये त्यांच्या सहकारी आणि मुख्य साक्षीदार प्रवास करत होत्या.

रेखा जरे यांचा पाय दुखत होता. त्यामुळे मी गाडी चालवत होते. काही अंतर दूर गेल्यावर गाडीच्या मागील भाग तुटून पडायला आला होता. त्यांच्या मुलाने याबद्दल मला सांगितले होते.  त्यानंतर रेखा जरे यांनी गाडी चालवायला घेतली.

भाजपला रोखण्यासाठी गोव्यातही ‘महाराष्ट्र पॅटर्न’?, काँग्रेसला मात्र भीती!

काही वेळानंतर दोन मुलं दुचाकीवरून आली आणि त्यांनी कारच्या आरशाला धडक दिली. त्यामुळे रेखा जरे यांनी कार थांबवून दोन तरुणांवर ओरडल्या. तेव्हा ते दोन्ही तरुण उलट रेखा जरे यांनाच कार नीट चालवता येत नाही का, असा वाद घालू लागले होते. रेखा जरे यांनी आपण यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आहोत, असं सांगितलं. पण, वाद वाढतच गेला. काही वेळाने दोन्ही तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि चाकूने सपासप वार केले. आम्ही तेव्हा गाडीतच होतो.

बाहेर येऊन पाहिले तर त्यांच्या मानेवर चाकूने वार केल्यामुळे जीभ बाहेर आली होती. आम्ही 100 नंबरला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पण, तात्काळ काही मदत मिळाली नाही. त्यांच्या मुलाने 108 ला फोन करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. त्यावेळी आम्हाला भीती वाटली की, कुणी तरी मागून येऊन आम्हाला ढकलून देईल. त्यामुळे आम्ही त्यांना तातडीने कारमध्ये बसवले आणि घटनास्थळावरून निघालो. पुढे टोल नाक्यावर आल्यानंतर रुग्णवाहिका उभी होती. तिथे रेखा जरे यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले."

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी  आतापर्यंत  फिरोज शेख,  ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे आणि  ऋषिकेश पवार या आरोपींना अटक केली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 6, 2020, 3:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या