अहेरी, 21 फेब्रुवारी: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम (NCP MLA Dharmarao Baba Atram) यांच्या सुरक्षारक्षकानं आत्महत्या (Bodyguard commit Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित सुरक्षा रक्षकानं काल सायंकाळी डोक्यात गोळी झाडून (Shoot himself) आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरात अशाप्रकारे भयावह शेवट केल्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे.
प्रमोद शेकोकर असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव आहे. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते अहेरी येथील पॉवरहाऊस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते. मृत शेकोकर यांची पत्नी देखील पोलीस दलात असून त्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत. प्रमोद शेकोकर यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अहेरी पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; हिजाबविरोधी पोस्टमुळे खून झाल्याचा आरोप
मिळेलेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद शेकोकर हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना काल रात्री आठच्या सुमारास शेकोकर यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि अहेरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा-लग्नाला जाणारं संपूर्ण कुटुंब संपलं, नाकातोंडात पाणी शिरून नवरदेवासह 9जणांचा अंत
पण घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या घरातून शेकोकर यांच्या घरात प्रवेश केला. घरातील चित्र पाहून पोलीसही हादरून गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शेकोकर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येचा कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. त्या अनुषंगाने नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Suicide