मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

BMC Election 2022 : मागच्या वेळी पिंपरीपाडा वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : मागच्या वेळी पिंपरीपाडा वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, यावेळी काय होणार?

आरक्षण सोडतीत वार्ड क्र. 42 हा खुला वार्ड झाल्यामुळे या ठिकाणाहून कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहे.

आरक्षण सोडतीत वार्ड क्र. 42 हा खुला वार्ड झाल्यामुळे या ठिकाणाहून कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहे.

आरक्षण सोडतीत वार्ड क्र. 42 हा खुला वार्ड झाल्यामुळे या ठिकाणाहून कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहे.

  मुंबई, 23 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. वार्ड क्रमांक 42 बाबत (Ward No. 42) बोलायचं झालं तर 2017मध्ये याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) बाजी मारली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार धनश्री भरडकर यांना 5897 मते मिळाली होती. जाणून घ्या वार्ड क्र. 42 बद्दल.. आरक्षण सोडतीत वार्ड क्र. 42 हा खुला वार्ड झाल्यामुळे या ठिकाणाहून कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या धनश्री भरडकर याठिकाणी निवडून आल्या होत्या. वार्ड क्रमांक 42मध्ये पी/ उत्तरमध्ये हा मतदारसंघ येतो. पिंपरीपाडा, अंबापाडा, महर्षी शंकरबुआ साळवी ग्राऊंड, शिवसृष्टी सेवा सोसायटी, फिल्मसिटी, संतोष नगर जंक्शन, नॅशनल पार्क, नागरी निवारा आदी परिसरांचा समावेश आहे. या वार्डची लोकसंख्या 51922 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3839 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 694 इतकी आहे. तसेच 2017च्या निवडणुकीत याठिकाणी एकूण 18 हजार 866 मतदारांनी मतदान केले होते. 2017च्या निवडणूकीत वार्ड क्रमांक 42मध्ये आठ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. जाणून घ्या कुणाला किती मते पडली होती -
  1. धनश्री भरडकर, राष्ट्रवादी - 5897
  2. रिना सुर्वे, शिवसेना - 5175
  3. दिपाली माईन, मनसे - 1170
  4. मोहिनी पाटील, बसपा - 235
  5. रेणू यादव, काँग्रेस - 1727
  6. पायल बारी, सपा - 727
  7. भारती बेंडे, भाजप - 3583
  8. विशाखा गुरव, अपक्ष - 42
  9. नोटा- 210
  हेही वाचा - ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी हा मतदारसंघ खुला झाल्याने या मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची असेल, असे अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या