मुंबई, 23 नोव्हेंबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणानंतर ड्रग अँगल समोर आला. त्यामुळे या केसमध्ये एनसीबीची एन्ट्री झाली. याप्रकरणात एनसीबी ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. रविवारी रात्री उशिरा एनसीबीची टीम गोरेगाव परिसरात एका ड्रग पेडलरला (Drug Peddler) पकडायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये एनसीबीचे 2 अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस (Mumbai Police) घटनास्थळी गेले आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम रविवारी उशिरा गोरेगाव परिसरात ड्रग पेडलरला पकडायला गेली होती तेव्हा तिथे आधीपासूनच जवळजवळ 50 लोक उपस्थित होते. NCBची 5 जणांची टीम सध्या वेशात ड्रग पेडलर मेंडिसला अटक करण्यासाठी गेली होती. त्या वेळेस अनोळखी व्यक्ती म्हणून एनसीबीच्या टीमला घेराव घालण्यात आला. NCB चे अधिकारी आहोत हे सांगण्या आधीच काही जणांनी NCB च्या टीमशी झटापट केली. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क झाला होता आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी आले होते. या प्रकरणी कॅरी मेंडेसा या अंमली पदार्थ तस्करा सह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यापैकी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी तिथे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेही उपस्थित होते.
Maharashtra: Three accused who were arrested for attacking NCB Zonal Director Sameer Wankhede and his team, have been sent to 14-day judicial custody. https://t.co/bcPNYxMvX0
— ANI (@ANI) November 23, 2020
हल्ल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांची सुटका केली. आणि 2 जखमी अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.