मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईत NCB ची मोठी कारवाई; 3 किलो हेरॉइनसह विदेशी महिलेला अटक, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

मुंबईत NCB ची मोठी कारवाई; 3 किलो हेरॉइनसह विदेशी महिलेला अटक, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या महिलेकडून 10,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील जप्त करण्यात आलं आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या महिलेकडून 10,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील जप्त करण्यात आलं आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या महिलेकडून 10,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील जप्त करण्यात आलं आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. NCB ने दक्षिण आफ्रिकेच्या एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे तीन किलो अंमली पदार्थ (3kg Drugs seize) जप्त करण्यात आलं आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या महिलेकडून 10,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील जप्त करण्यात आलं आहे. ही महिला कतार एअरवेजच्या विमानाने जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईला आली होती, अशी माहितीही मिळाली आहे.

NCBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी ही महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. त्यावेळी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने तिच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी तिच्या बॅगमध्ये सुमारे 2.960  किलो एवढं हेरॉइन सापडलं आहे. संबंधित महिलेविरोधात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी पुढं सांगितलं की, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तयार करण्यात आलेली हेरॉइनची वाहतूक कतार एअरलाइन्सने जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईत आणण्यात आलं होतं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबण्याची तिची योजना होती. त्यानंतर भारतातील आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित लोकांशी संपर्क साधणार होती. पण त्याआधीच NCB ने तिला मुंबई विमानतळावर पकडलं आहे.

हेही वाचा- भाजप महिला कार्यकर्ती ड्रग्जच्या आहारी; पोलिसांना कारमध्ये सापडलं लाखोंचं कोकेन

अशाप्रकारे हे अंमली पदार्थांचं जाळे निर्माण केलं आहे

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, पकडण्यात आलेल्या 3 किलो अंमली पदार्थ अफगाणिस्तान येथील असून तो अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तयार करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातून ते इराण किंवा मध्य पूर्वच्या इतर देशांमध्ये पाठविलं जातं आणि तेथून दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेतून इतर देशांना त्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्याची वाहतूक केली जाते.

First published:
top videos

    Tags: Drug case, Mumbai, NCB, Pakistan, South africa