मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात डी कंपनीने थाटले होते दुकान, NCB ने 3 अड्डे केले उद्ध्वस्त

पुण्यात डी कंपनीने थाटले होते दुकान, NCB ने 3 अड्डे केले उद्ध्वस्त

पुण्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने किराणा दुकानातून ड्रग्स तस्करीचे दुकान थाटले होते.

पुण्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने किराणा दुकानातून ड्रग्स तस्करीचे दुकान थाटले होते.

पुण्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने किराणा दुकानातून ड्रग्स तस्करीचे दुकान थाटले होते.

पुणे, 24 जानेवारी : राज्याची सांस्कृतिक  राजधानी असलेल्या पुण्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने किराणा दुकानातून ड्रग्स तस्करीचे दुकान थाटले होते. अंमलीविरोधी पथकाने धडक कारवाई करून हडसरमधील 3 गोडाउन उद्ध्वस्त केली आहे. अंमली विरोधी पथक (NCB) ने काही दिवसांपूर्वी गँगस्टर करीम लालाचा नातू चिंकू पठाणला अटक केली होती. त्याच्याकडे असलेल्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या डायरीचे कनेक्शन थेट पुण्यापर्यंत पोहोचले आहे. डी गॅंग पुण्यातही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. एनसीबीच्या टीमने शनिवारी पुण्यातील काही भागात छापे टाकले होते. हडपसर आणि 3 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. चिंकू पठाणच्या ड्रग्स सप्लायरने वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्सचा साठा करून ठेवला होता. एनसीबीच्या पथकाने ड्रग्स सप्लायरच्या गोडाऊनवर छापे टाकले. मात्र, ऐनवेळी आरोप घटनास्थळावरून पसार झाले आहे. मात्र, NCB ने त्याचे गोडाऊन उद्ध्वस्त केले आहे. पुण्यातील हडपसर भागात चिंकूचे अंमली पदार्थांचे गोडाऊन होते. एवढेच नाहीतर पुण्यातून किराणा मालातून अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती.  एनसीबीच्या पथकाने हा सर्व साठा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत मात्र सप्लायरर्स पळून गेले आहे, त्यांचा शोध पोलीस घेत आहे. तसंच हडपसर, खडकवासलासह 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. राजू सोनावणे नावाच्या सप्लायरवर धाड टाकण्यात आली. परंतु,   राजू सोनावणे फरार झाला आहे. त्याच्या घरी सुद्धा धाड टाकली होती. त्याच्याकडे 3 मोठे गोडाऊन आहेत.  जिथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहेत. कोण आहे चिंकू पठाण? अंडरवर्ल्ड डॉन आणि तस्करीच्या दुनियेतील कुख्यात करीमलाला पठाणचा चिंकू पठाण हा नातू आहे. मला 'गोल्डन डॉन' बोलायचे असं हा याच्या पंटरना सांगायचा. NCB ने याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली. याच्याकडून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. चिंकूला मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्याखाली तडीपार केले आहे. पण तरीही तो आपले कनेक्शन वापरुन डोंगरीत येत होता. शेवटी त्याचा मुक्काम आता जेलमध्ये झालाय कारण त्याने अंमली पदार्थ तस्करी करुन थेट NCB च्या समीर वानखेडेंशी पंगा घेतला होता. दाऊदचे मुंबईतील ड्रग्सचे नेटवर्क संपवण्याचा विडाच जणू एनसीबीने उचलला. एकमागोमाग एक कारवाई करत एनसीबीने डी कंपनीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर चिंकू पठाण सारख्या दाऊदच्या मोठ्या हस्तकांच्या मुसक्या एनसीबीने आवळल्याने डी कंपनीचं कंबरडंच मोडले आहे.
First published:

पुढील बातम्या