मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नक्षलवाद्याने गावकऱ्याची गोळी घालून केली हत्या; संतप्त जमाव रात्री उशिरा त्याच्या घरात घुसला आणि...

नक्षलवाद्याने गावकऱ्याची गोळी घालून केली हत्या; संतप्त जमाव रात्री उशिरा त्याच्या घरात घुसला आणि...

गावकरी इतके चिडले होते की त्यांनी नक्षलवाद्याच्या पत्नीलाही सोडलं नाही, तर...

गावकरी इतके चिडले होते की त्यांनी नक्षलवाद्याच्या पत्नीलाही सोडलं नाही, तर...

गावकरी इतके चिडले होते की त्यांनी नक्षलवाद्याच्या पत्नीलाही सोडलं नाही, तर...

रांची, 2 डिसेंबर : झारखंडच्या पलामूमध्ये (Palamu) एका नक्षलवाद्याने गावकऱ्याची गोळी (Naxalites Kills Villager) घालून हत्या केली. मात्र यानंतर गावाने जे पाऊल उचललं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. यानंतर संतप्त जमावाने आरोपी नक्षलवादी आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. जमीन वादामुळे ही घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी (झारखंड पोलीस) पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पलामू गावातून खळबळजनक घटना आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरण मनातू पोलीस स्टेशन परिसरातील कुंडिलपूर गावातील आहे. येथे बंदी घातलेली नक्षलवादी संघटना जेजेएमपीशी संबंधित एका सक्रिय नक्षलवाद्याने जमीन वादातून एका गावकऱ्याला गोळ्या घालून ठार केले. यानंतर चिडलेल्या जमावाने नक्षलवाद्याला व त्याच्या पत्नीला वेढले व त्यांना मारहाण केली. दोघांनाही मारहाण केल्यानंतर ते जिवंत राहू नये यासाठी त्यांना गोळी मारल्याची बाबही समोर आली आहे.

जमिनीच्या वादातून घडला हा प्रकार

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की, दोन्ही पक्षात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी प्रकाश सिंह आठ दिवसांपूर्वी आपल्या घरी आला होता. यावेळी शेजारच्या विनोदशी त्याचा वाद झाला.

पोलिसांचा तपास सुरू

सांगितलं जात आहे की शुक्रवारी रात्री उशिरा प्रकाश सिंहने विनोदवर गोळी झाडली व त्याची हत्या केली. याची माहिती मिळताच गावकरी एकत्र आले व त्यांनी नक्षलवादी प्रकाश सिंहला त्याच्या घरात घेरलं. त्याच्याजवळील शस्त्र घेऊन त्याला व त्याची पत्नी तेरंगनी देवी हिला मारहाण केली. मारहाणीत जबर जखमी झाल्यानंतर त्या दोघांनाही गोळी मारुन त्यांची हत्या केली.

First published:
top videos

    Tags: Murder