Home /News /crime /

दारातूनच लेकीच्या लग्नाची वरात परतली; नवरदेवाच्या निर्णयामुळे नवरीला धक्का...

दारातूनच लेकीच्या लग्नाची वरात परतली; नवरदेवाच्या निर्णयामुळे नवरीला धक्का...

नवरदेव परतण्याच कारण वाचून कोणालाही संताप येईल.

    पाटना, 21 फेब्रुवारी : नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना काहीच कमू पडू नये असं प्रत्येक मुलीच्या बापाची इच्छा असते.  मात्र अनेकदा काहीतरी राहून जातं. यानंतर काही मंडळी नवरीच्या बापाला बोलणी लावतात. अनेकदा लग्न (Daughters Marriage) तोड़ून भर मंडपातून निघून गेल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बिहारमधील (Bihar News) पूर्णिया येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील पूर्णिया भागातील आहेत. येथे लग्न समारंभात नवऱ्याच्या वरातीला जेवण देण्यास उशीर झाल्यामुळे नवरदेवाने असा निर्णय घेतला ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. लग्न समारंभात वऱ्हाड्यांना उशिरा जेवण मिळाल्यामुळे नाराज नवरदेव आणि त्याच्या वडिलांनी सर्व वऱ्हाड्यांना परतायला सांगितलं. स्वत:देखील आपल्या नातेवाईकांसह लग्न न करता निघून गेले. दारातून मुलीच्या लग्नाची वरात निघून गेल्यामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर नवरीच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे ही वाचा-मोबाइलमुळे संसाराची झाली राख-रांगोळी; नागपुरात विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल वऱ्हाड्यांना जेवण द्यायला थोडा उशिर झाला म्हणून नवरदेव आणि त्याच्या वडिलांना राग आला. ज्यानंतर ते आपल्या सर्व नातेवाईकांसह लग्न न करता निघून गेले. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक लोक प्रतिनिधींना नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढली तरी ते ऐकण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Marriage

    पुढील बातम्या