जोधपुर, 1 नोव्हेंबर : जोधपुरमधील रातानाडा पोलीस ठाणे हद्दीत (Ratanada Police Station) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एक तरुण लग्नापूर्वी आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन फरार झाला. 27 ऑक्टोबर रोजी अक्षता वाटण्याचा विधीदेखील पूर्ण करण्यात आला होता. नवरदेव फरार झाल्याचं कळताच नवरीला (Bride) धक्का बसला. यानंतर तिने पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे नवरदेव बादल नायक (Badal Nayak) ज्या मुलीला घेऊन फरार झाला तिच्या वडिलांनी (Father) मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
जोधपुरच्या तरुणाने बादल नायक याचं लग्न दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन ठरवण्यात आलं होतं. लग्नपत्रिकादेखील छापण्यात आली होती. लग्न 14 नोव्हेंबर रोजी जवाहर नगर येथील राहणाऱ्या तरुणीसोबत ठरलं होतं. यादरम्यान नवरदेव ज्या तरुणाला घेऊन फरार झाला होता, तिच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टनंतर जेव्हा पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलावलं तर नवरीने सर्वांसमोर तरुणाच्या कानशिलात लगावली. यावेळी तिनही कुटुंबीय पोलीस ठाण्यात जमा झाले होते.
हे ही वाचा-दोस्तीत कुस्ती! लग्नाला 15 दिवस बाकी असताना मित्राच्या GF ला घेऊन ठोकली धूम
बेपत्ता झालेली तरुणी नवरदेवासोबत फरार..
भारद्वाज कुटुंबीयांनी शनिवारी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रिपोर्टमध्ये दिल्यानुसार त्यांची मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी नवरदेवासोबत फरार झाली आहे. ते आर्य समाजमध्ये लग्न करू इच्छित होते. मात्र शनिवारी लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर ते दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले.
नवरदेव चक्क आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन फरार झाल्याने गावात जोरदार चर्चा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Crime news, Marriage