Home /News /crime /

स्वत:च्या लग्नात जवानाच्या हत्येच्या आरोपाखाली नवरदेवाला अटक; बंदुक चालवल्याचा Videoही आला समोर

स्वत:च्या लग्नात जवानाच्या हत्येच्या आरोपाखाली नवरदेवाला अटक; बंदुक चालवल्याचा Videoही आला समोर

आर्मी मित्राच्या हत्येसाठी नवरदेवाला अटक करण्यात आली आहे.

    लखनऊ, 23 जून : स्वत:च्या लग्नात नवऱ्याला आनंदाच्या भरात फायरिंग (Firing) करणं महागात पडलं आहे. नवरदेवाने घोड्यावर बसलेला असताना फायरिंग केली. आणि दुर्देवाने ही गोळी पाहुण्यांमधील एकाला लागली यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पाहुणा हा आर्मी जवान होता. जवानाच्या मृत्यूनंतर आरोपी नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्या पिस्तुलाने गोळी चालवण्यात आली होती, ती आर्मी जवान (Army Jawan death) बाबूलाल यांचीच होती. या घटनेचा एक व्हिडीओही (Viral Video) समोर आलं आहे. या घटनेनंतर लग्न घरात शोककळा पसरली. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) सोनभद्र जिल्ह्यातील आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव मनिष हा पिस्तुल घेऊन हर्ष फायरिंग करीत होते. यादरम्यान गोळी त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या बाबूलाल यादव याला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर लग्न घरावर शोककळा पसरली. बाबूलाल यादव (38) आर्मीचे जवान होते. ज्या पिस्तुलाने बाबूलाल यांचा मृत्यू झाला ती परवानाधारक पिस्तुल होती. बाबूलाल यादवच्या कुटुंबीयांनी दिल्यानुसार ते काश्मीरात तैनात होते. आणि मनिषच्या लग्नात सामील होण्यासाठी सुट्टी घेऊन आले होते. बाबूलाल मंगळवारी आपल्या मित्राच्या लग्नात आले होते. यादरम्यान हर्ष फायरिंगमध्ये बाबूलाल यांचा त्यांच्याच बंदुकीमुळे जीव गेला. बाबूलाल त्यांच्या कुटुंबीयांचा एकमेव आधार होते. त्याच्या कुटुंबीयांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करीत आरोपी नवरदेवाला अटक करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh

    पुढील बातम्या