नवी मुंबई (प्रमोद पाटील) 27 नोव्हेंबर : नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी बाजूला बसलेल्या दोघांनी मोठ्याने आणि शिवीगाळ करण्यावर आक्षेप घेत, त्यांना हटकले. त्यावर त्यांनी हरकत घेत,सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली,त्यावरून वाद इतका टोकाला गेला. बारा जणांनी दोघांवर हल्ला केला.
हे ही वाचा : चोराने मारला 'चौकार', नकली पिस्तुल दाखवून लुटले 15 तोळे सोनं!
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी बाजूला बसलेल्या दोघांनी मोठ्याने आणि शिवीगाळ करण्यावर आक्षेप घेत, त्यांना हटकले.
नवी मुंबईतील क्वालिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये तुफान राडा; 12 जणांनी खुर्च्या, प्लेट, काचेच्या बाटल्यांनी दोघांना केली मारहाण#NaviMUmbai #CrimeNews #MaharashtraNews #News18Lokmat pic.twitter.com/MlD0M55rdX
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2022
त्यावर त्यांनी हरकत घेत,सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली,त्यावरून वाद इतका टोकाला गेला. की बारा जणांनी दोघांवर हल्ला केला. हॉटेल मधील खुर्च्या,जेवणाच्या प्लेट,आणि बीयरच्या बाटल्यांनी दोघांच्या डोक्यावर मारत हल्ला चढवत जबर मारहाण केली.या ही मारहाण सुरू असताना 12 जणांपैकी काहींनी फिर्यादी दोघांच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल लंपास केला.
हे ही वाचा : भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त
मारहाण करून चैन,आणि मोबाईल चोरून आरोपी फरार झाले,मारहाण झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.12 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून, बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व 12 आरोपींवर 395, 397 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फिर्यादी मधील एकजण रेल्वे पोलीस असल्याची माहिती आहे. मात्र नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Mumbai