Home /News /crime /

Nashik Crime : नाशिक सुफी धर्मगुरू हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, सुपारी घेऊन हत्या केल्याचा संशय

Nashik Crime : नाशिक सुफी धर्मगुरू हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, सुपारी घेऊन हत्या केल्याचा संशय

नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra nashik yevala) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या (muslim dharm guru shot dead) धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  नाशिक, 06 जुलै : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra nashik yevala) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या (muslim dharm guru shot dead) धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची पोलिसात (Nashik police) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागच्या कित्येक दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान हे गुरू अफगाणिस्तानमध्ये राहत होते. चार जणांनी ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. येवला येथील (nashik yevala midc) एमआयडीसी परिसरात सायंकाळी ही घटना घडली.

  दरम्यान या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. हत्या झालेला व्यक्ती हा अफगाणिस्तानचा असून येथे काही वर्षांपासून वावीत रिफ्युजी म्हणून राहत होता. या वर्षाच्या शेवटी त्याची मुदत संपणार होती त्याने वावी परिसरात 5 एकर जमीन दुसऱ्याच्या म्हणजे त्याच्या मॅनेजरच्या नावावर घेतली होती. आणखी काही त्याची प्रॉपर्टी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

  हे ही वाचा : कोल्हापूरला महापुराची पुन्हा धास्ती, पुढच्या काही तासांतच धोक्याची पातळी गाठणार?

  ते पुढे म्हणाले कि, स्वतःला तो मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंचा अवतार सांगत असे त्याचे देश-विदेशात अनुयायी असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्याला येवल्यात एका जागेची पाहणी करायची आहे असे सांगून त्याला वावी येथून मॅनेजरसह दोन जण घेऊन आले. येवल्याच्या चिंचोडी एमआयडीसी भागात आल्यानंतर येथे अगोदरच तीन जण उपस्थित होते त्यांनी गोळ्या झाडून हत्त्या केली आणि सर्व पांच ही जण फरार झाले. असल्याचे ते म्हणाले. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकऱ्यांमध्ये सुपारी घेऊन हत्त्या करणारे गुंड असल्याचे समोर आले आहे. जवळपास त्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

  पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव ख्वाजा सय्यद चिश्ती असे आहे, जो येवल्यात 'सूफी बाबा' म्हणून ओळखला जात होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे एक एसयुव्ही वाहन जप्त करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मगुरूंची हत्या करून वाहन तेथेच ठेवून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत.

  हे ही वाचा : काय महागाई...काय दर..., सिलेंडरचे पुन्हा 50 रुपयांनी महागले, आता हजार रुपयेच मोजावे लागणार!

  येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहोत. आरोपींनी सुफी बाबावर शेतात गोळ्या झाडल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून एक वाहन जप्त केले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime, Crime news, Murder news, Nashik

  पुढील बातम्या