Nashik News : रोलेट कॅसिनो अ‍ॅपमुळे कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याची आत्महत्या, डिलरला अटक

Nashik News : रोलेट कॅसिनो अ‍ॅपमुळे कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याची आत्महत्या, डिलरला अटक

रोलेट जुगारात कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्या प्रकरणात कैलास शहाला ताब्यात घेतले.

  • Share this:

नाशिक, 11 मार्च : रोलेट कॅसिनो ऑनलाइन (Roulette Casino Online) या गेमिंग अ‍ॅपमुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डिलर कैलास शहाला त्रंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईनं मोठी खळबळ माजली आहे.

गुन्हा दाखल झाला आणि नाशिक पोलिसांनी याची पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली. याच प्रकरणात या कैलास शहाला अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाइन गेम्स खेळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यातच हा गेम खेळतांना मिळणारा पैसा आणि त्यामुळे व्यसन लागल्याच्या अनेक तक्रारींची राज्यात नोंद झाल्याचं, पोलिसांचं म्हणणं आहे. याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.

MPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबत माहिती देतांना सांगितलं की, 'रोलेट जुगार डिलर कैलास शहा याला त्रंबकेश्वरला अटक करण्यात आली आहे. रोलेट जुगारात कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्या प्रकरणात कैलास शहाला ताब्यात घेतले. रोलेट या ऑनलाइन अ‍ॅपवर,ऑनलाइन जुगार खेळला जातो.'

दरम्यान या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून डिजिटल डिव्हाईस ताब्यात घेतले आहे. या डिव्हाईसमध्ये काही छेडछाड केली आहे का याची तपासणी पोलीस करणार आहेत. हे नेटवर्क इतर जिल्ह्यातही असून ताब्यातील आरोपी कैलास शहा याचे वडील गॅम्बलिंगचे जनक असल्याचा धक्कादायक दावाही  पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केल्यानं मोठी खळबळ माजली आहे.

बिग बॉसमधील अभिनेत्री झाली पॉर्नस्टार; केली आगामी चित्रपटाची घोषणा

या अ‍ॅपला परवानगी आहे का? हे अ‍ॅप गेमिंग आहे का जुगारी अ‍ॅप? या प्रश्नांना पोलीस अधीक्षक यांनी बगल देऊन हा तपासाचा भाग असल्याचं उत्तर दिल्यानं,या प्रकरणातील तथाकथित अर्थकारणाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान,या प्रकरणात अजून अनेक बडे हाती लागणार असल्याचे संकेत मिळताय.खरं तर रोलेट कॅसिनो या ऑनलाइन खेळाला सरकारी परवानगी आहे की नाही ? याबद्दल मात्र तपास यंत्रणा काही बोलायला तयार नाही. यामुळे या प्रकरणातील गूढ कायम आहे.

Published by: sachin Salve
First published: March 11, 2021, 5:25 PM IST

ताज्या बातम्या