Home /News /crime /

4 जणांच्या हत्याकांडातील आरोपींना शोधण्यात अपयश, आता पोलिसांनी लढवली वेगळी शक्कल

4 जणांच्या हत्याकांडातील आरोपींना शोधण्यात अपयश, आता पोलिसांनी लढवली वेगळी शक्कल

आरोपींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी वेगळी शक्कल लढवली आहे.

नांदगाव, 10 ऑगस्ट : नांदगावच्या वाखारी येथे एकाच कुटुंबातील 4 जणांच्या हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस प्रशासनाने 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शिवाय आरोपींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी वेगळी शक्कल लढवली आहे. एखाद्या मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा सुगावा लागत नसेल तर पोलीस टीव्ही, सोशल मीडिया,वृत्तपत्र, हॅन्डबिलचा वापर करून आरोपींची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन करतात. मात्र या माध्यमाऐवजी आजच्या आधुनिक युगात थेट जुन्या काळातील दवंडी देण्याच्या पद्धतीचा वापर पोलीस करीत आहेत. नांदगावच्या वाखारी येथे 2 लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली होती. या घटनेला 4 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर देखील आरोपींबाबत कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि याची माहिती गावागावात दवंडीद्वारे दिली जात आहे. आधुनिक व विज्ञानाच्या या युगात पोलिसांनी अवलंबलेला दवंडीचा जुना मार्ग चर्चेचा विषय ठरत आहे. नांदगावमध्ये नेमकं काय घडलं होतं? गाढ झोपेत असलेले समाधान चव्हाण, भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा 6 वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि 4 वर्षाची आरीही चव्हाण यांचा अज्ञात मारेकऱ्यांना गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे समाधान चव्हाण हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता त्याच्याकडे जास्त शेतीदेखील नाही. शिवाय त्याचे कोणाशी भांडण देखील नव्हतं, असं ग्रामस्थांचे म्हणणं आहे. त्यामुळे खून कोणी व का केला याचे गूढ वाढले आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या