HAL हेरगिरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला दीपक शिरसाठ!

HAL हेरगिरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला दीपक शिरसाठ!

HAL मधील फायटर विमानांची आणि नियोजन आराखड्याच्या गोपनीय माहितीची हेरगिरी झाल्याचा संशय असून दीपकने ISI संबंधित महिलेला माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 10 ऑक्टोबर : पाकिस्तान येथील आयएसआय (ISI) या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती देणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दीपक शिरसाठला हनी ट्रॅपचा वापर करून आयएसआयने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.

नाशिक येथील भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये  तांत्रिक विभागाचा सहायक पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या दीपक शिरसाट पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेनं संपर्कात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. दीपकला  हनी ट्रॅपचा वापर करून ISI नं जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे.  HAL मधील फायटर विमानांची आणि नियोजन आराखड्याच्या गोपनीय माहितीची हेरगिरी झाल्याचा संशय असून दीपकने  ISI संबंधित महिलेला माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे नाशिक शहरात ISI चं हनी ट्रॅपचं जाळं असल्याचं समोर आलं आहे. यात एकापेक्षा जास्त महिला असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे.

दीपक शिरसाठच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा डेटा तपासला जात आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे.  त्यामुळे  HAL सह 11BRD वायुसेना स्टेशनवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी  दहशतवाद विरोधी पथकांनं दीपक शिरसाटला अटक केली. दीपकने  आर्टलरी सेंटरमध्ये हेरगिरी करत ISIला फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रालह माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे.

दीपक हा एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसंच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या.

दीपकविरुद्ध कलम 3 , 4 , आणि 5 शासकीय गुपिते अधिनियम 1923 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर आरोपी दीपक शिरसाट याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, 5 सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 10:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या