Home /News /crime /

टोमॅटोच्या कॅरेटमध्ये चक्क दारुच्या बाटल्या, नाशिक उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

टोमॅटोच्या कॅरेटमध्ये चक्क दारुच्या बाटल्या, नाशिक उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

नाशिकमध्ये (Nashik) चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक, 20 डिसेंबर : काही घटना समोर आल्या की आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. घटना समजल्यानंतर लोकं असं वागूच कसं शकतात? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमधून (Nashik) समोर आली आहे. नाशिकमध्ये एका टोमॅटोची (Tomato) वाहतूक करणाऱ्या पिकअप (Pickup) गाडीवर उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) धाड टाकली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण गाडीची झडती घेतली तेव्हा टोमॅटोच्या कॅरेटमध्ये टोमॅटो ऐवजी थेट दारुच्या बाटल्या निघाल्या. हे सगळं दृश्य पाहून अधिकारी देखील चक्रावले.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमध्ये चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईनंतर हा प्रकार समोर आलाय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अवैध मद्याचा तब्बल 7 लाखांचा साठा जप्त केला. त्यातून हा सर्व प्रकार उघड झाला. हेही वाचा : एकाच वेळी फणा काढलेले तीन कोब्रा, लोक म्हणाले सुरूय मोठी मीटिंग; पाहा VIDEO

दादरा नगर हवेलीहून अवैध मद्याची वाहतूक

महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून बेकायदेशीररित्या राज्यात विक्रीसाठी आणला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनातून टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे. दरम्यान, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचं या कारवाईवरुन स्पष्ट झालं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता याचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे. हेही वाचा : टपरीवाल्याला मी मंत्री बनवलं, एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी

दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने 31 डिसेंबरला मोठा उत्साहात ठिकठिकाणी पार्टीचं आयोजन केलं जातं. यावेळी अनेकजण मद्यपान करतात. पण राज्यावर सध्या कोरोना संकट असल्याने मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होईल. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढेल या भीतीतून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत ओमायक्रोनच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. दरम्यान, 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवेळी मद्यप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केलं जातं. मद्याची मोठी प्रमाणात विक्री केली जाते. याशिवाय दादरा नगर हवेली, दिव-दमन येथील मद्याला मोठी मागणी असते. त्यामुळे अशाप्रकारे अवैधपणे या मद्याची वाहतूक केली जाते. पण या वाहतुकीवर आणि मद्यविक्रीस राज्यात बंदी आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या