• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • जेव्हा लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर सराईत गुन्हेगार जेरबंद होतात, पोलिसांच्या कारवाईची इनसाईड स्टोरी

जेव्हा लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर सराईत गुन्हेगार जेरबंद होतात, पोलिसांच्या कारवाईची इनसाईड स्टोरी

लसीकरणाच्या सर्टिफिकेटने (Vaccination Certificate) महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठी मदत केली आहे. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरुनच पोलिसांनी दोन सराईत चोरांना बेड्या (Thieves arrest) ठोकल्या आहेत.

 • Share this:
  नंदुरबार, 25 नोव्हेंबर : पासपोर्ट (Passport) आणि आधारकार्डप्रमाणे (Aadhar card) आता लसीकरणाचं सर्टिफिकेटही (Vaccination Certificate) आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. मॉलमध्ये (Shopping Mall) प्रवेशापासून ते लोकल ट्रेन (Local train) प्रवास, किंवा हवाई आणि सागरी मार्गाने प्रवास करण्यासाठी देखील लसीकरणाचं सर्टिफिकेट जरुरीचं आहे. विशेष म्हणजे या लसीकरणाच्या सर्टिफिकेटने महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठी मदत केली आहे. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरुनच पोलिसांनी दोन सराईत चोरांना बेड्या (Thieves arrest) ठोकल्या आहेत. या चोरांची एक मोठी टोळी (thieves gang) आहे. ही टोळी घरफोड्या करुन लगेच फरार व्हायची. ते पोलिसांसाठी काहीच पुरावे देखील शिल्लक ठेवायचे नाहीत. त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. पण अखेर एकदा ते पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. आरोपींनी पळण्याचा खूप प्रयत्न केला. विशेष म्हणजे रात्रीचा अंधार आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन त्यांनी आपली हातातली गाडी सोडली आणि ते पळून गेले. पण त्यांची गाडी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळाले. त्याच सर्टिफिकेटच्या आधाराने पोलिसांनी प्रचंड संयमाने देशातील दोन वेगवेगळ्या शहरांमधून आरोपींना बेड्या ठोकल्या.

  नेमकं काय घडलं?

  संबंधित घटना ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेकजण आपापल्या गावी किंवा आजोळला सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे टाळं असलेल्या घरांची घरफोडी करुन घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याच्या घटना जिल्ह्यात वाढल्या होत्या. विशेष म्हणजे चोरांची एक आंतरराज्यीय टोळी जिल्ह्यात धुमाकूळ घालत होती. त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. पण पोलीस या घटनांमुळे सावध झाले होते. आंतरराज्यीय चोरांच्या या टोळीने 10 नोव्हेंबरला चोरीचा प्रयत्न केला. पण त्या चोरीची माहिती पोलिसांना वेळेवर मिळाली. त्यानंतर नंदुरबार पोलिसांचे एक पथक या चोरांचा पाठलाग करत होते. या दरम्यान सारंगखेडा येथे चोर-पोलीस यांची गाडी आमनेसामने उभी राहिली. पण अंधाराचा फायदा घेऊन चोरटे हातातली गाडी जमिनीवर सोडून जंगालाच्या मार्गाने फरार झाले. हेही वाचा- याला म्हणतात प्रामाणिकपणा, पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी केला 90 किमी प्रवास

  पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?

  चोरटे पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती पुन्हा निराशा आली. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची झडती घेतली असता सुरुवातीला त्यांना फारसं काहीच मिळालं नाही. पण पोलिसांनी परत एकदा गाडीत असलेले कागदत्रे पाहिले तर तिथे लसीकरणाचं सर्टिफिकेट हाती लागलं. याच सर्टिफिकेटच्या आधारावर चोरांची ओळख झाली. त्यानंतर पोलिसांनी दोन टीम पुणे आणि मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात पाठवल्या. तिथे पोलीस जवळपास 15 दिवस आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर संधी मिळताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हेही वाचा- विषारी वायू पसरल्यानं दहशत, काही लोकांच्या डोळ्यात जळजळ तर डझनभर लोक बेशुद्ध

  आरोपींच्या चौकशीतून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता

  पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांची शैलेंद्र विश्वकर्मा आणि संतोष सिंह अशी नावं आहेत यापैकी शैलेंद्रवर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मिळून तब्बल 63 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी संतोष सिंह हा 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडलेला आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींची चौकशी केली तर तीनही राज्यांमधील अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: