कोराडी, 5 ऑक्टोबर : नागपूर ग्रामीण परिसराच्या कोराडी पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नेपाळी तरुणी सोबत ब्लॅकमलिंग करून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेपाळी तरुणीसोबत उत्तरप्रदेशात बलात्कार करण्यात आला. तिचे नग्न फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
जीव वाचविण्यासाठी पीडित युवती नागपुरातील मैत्रिणीकडे आली. तिच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अत्याचारी युवक व त्याच्या मानलेल्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण जयपाल यादव (वय 25, रा. लखनौ) व सुफीयाना विश्वकर्मा मूळ रा. नेपाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
पीडित तरुणी 2018 पासून नोकरीच्या शोधात असून नोकरी शोधताना पीडितेला काही तरुणांनी फसवलं आणि त्यानंतर तिला बोलवून ती बेशुद्ध होईल असे द्रव सॉफ्ट ड्रिंक्समध्ये देण्यात आलं. त्यानंतर सदर तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तसंच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
अखेर आपला जीव वाचविण्यासाठी नेपाळची पीडित तरूणी नागपुरात आपल्या मैत्रिणीकडे आली. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सध्या चौकशीसाठी पीडित नेपाळी तरुणी पोलिसांसोबत सध्या लखनौ इथं गेली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.