Home /News /crime /

नागपूरमधील सर्वात मोठ्या वेश्यावस्तीवर पोलिसांची कारवाई,16 महिलांसह 12 जण ताब्यात

नागपूरमधील सर्वात मोठ्या वेश्यावस्तीवर पोलिसांची कारवाई,16 महिलांसह 12 जण ताब्यात

नागपूर शहरातील गंगा-जमुना परिसरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात केल्या जातो.

नागपूर, 06 ऑक्टोबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिसांनी गंगाजमुना वेश्यावस्तीवर धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा मारून 16 महिला आणि 12 ग्राहकांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. नागपूर शहरातील गंगा-जमुना परिसरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात केल्या जातो. या ठिकाणी महिला रस्त्यावर उभ्या राहून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करतात. यामुळे परिसरातील लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या परिसरातून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य महिलांकडेही संशयाच्या नजरेने बघितले जाते. सर्वाधिक वारांगणा काश्मिरी गल्लीत आहेत. कोरोनाच्या काळात हा परिसर बंद होता पण आता पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून सर्वच बाजारपेठा बंद होत्या. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच अटी शिथिल करण्यात आल्या आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. चीन आणि पाकला धडा शिकवणार भारताची ‘K मिसाइल फॅमिली’, वाचा या मिसाइलची वैशिष्ट्ये त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा आंबडशौकिनांनी गर्दी होत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करण्याची सुचना केली आहे. परंतु, या परिसरात सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडवला जात आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या गर्दीमुळे लकडगंज पोलिसांनी धडक कारवाई केली. सोमवारी रात्री उशिरा गंगाजुमना या वेश्यावस्तीमध्ये छापा मारण्यात आला.  यावेळी पोलिसांनी 16 महिला आणि 12 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या