गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी हा आहे नागपूर पोलीस आयुक्तांचा नवा प्लान

नागपूर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी 'ऑपरेशन वाईप आऊट' राबविण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर, पोलिस आयुक्त, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गुन्हेगारी, ऑपरेशन वाईप आऊट,

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2018 06:31 PM IST

गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी हा आहे नागपूर पोलीस आयुक्तांचा नवा प्लान

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 4 ऑक्टोबर : नागपूरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारांची रसद बंद करण्यासाठी 'अवैध धंदे आठवडाभरात बंद करा अथवा कारवाईसाठी तयार रहा', असा आदेश नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या आदेशाला 'ऑपरेशन वाईप आऊट' असे नाव देण्यात आलंय.

यासंदर्भात न्यूज18 लोकमतशी बोलताना नागपुरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. गुन्हेगार अवैध दारू विक्री, जुगार अड्डा, मटका अड्डा, चोरीच्या मालाची विक्री, वेश्याव्यवसाय, अवैध सावकारी, खंडणी वसुली करतात. यातून मोठी रक्कम मिळवून गुन्हेगार आपली आर्थिक स्थिती मजबूत करतात. सोबतच या अवैध धंद्यात झोपडपट्टीतील गरिबांच्या मुलांना गुंतवून त्यांनाही गुन्हेगारीत सहभागी करून घेतात. सराईत गुन्हेगार या अल्पवयीन आणि गरीब मुलांकडून अवैध धंदे करवून घेत त्यांना बालवयातच गुन्हेगारीचे धडे देतात.

मोठी रक्कम हाताशी असल्यामुळे गुन्हे करताना सापडले तर ते पैशाच्या जोरावर चांगले वकील उभे करून कायद्यातून पळवाटा काढत स्वत:ची सोडवणूक करून घेतात. अशा प्रकारे अवैध धंदे, गुन्हेगारी करूनही त्याचे काही बिघडत नाही, असा वाईट मेसेज गुन्हेगारीच्या वाटेवर असलेल्यांमध्ये जातो. त्यामुळे दुसऱ्या गुन्हेगारांचीही हिंमत वाढते. परिणामी ते देखील मोठे गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्यांसोबतच गुन्हेगारांचीही संख्या वाढते. त्याचा थेट परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बिघडविण्यावर होतो. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

 मुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...