Home /News /crime /

नागपूर हादरलं, भर चौकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

नागपूर हादरलं, भर चौकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

आज सकाळी नागपूरच्या भारत टाकीज जवळ सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.

नागपूर, 16 ऑगस्ट : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. एका जुन्या वादातून  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज सकाळी नागपूरच्या भारत टाकीज जवळ सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. देवा उसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने नवऱ्याला सोडून केला दुसऱ्यासोबत प्रेमविवाह, पतीने गाठले घरं आणि... देवा उसरे हे  गड्डीगोदाम परिसरात राहतात. आज सकाळी उसरे चहा घेण्यासाठी घराशेजारी एका टपरीवर आले होते. त्यांनी आपली दुचाकी लावून खाली उतरले असता तेवढ्यात दोन तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात उसरे हे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उसरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी उसरे यांनी मृत घोषित केले. उसरे यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेत  आहे. मुंबईजवळ विवाहित महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात उसरे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उसरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर राजेश तांबे यांना पराभूत केले होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या