Home /News /crime /

नागपूर हादरलं, अवघ्या 2 तासांपूर्वी जन्मलेलं बाळ रस्त्यावर फेकलं!

नागपूर हादरलं, अवघ्या 2 तासांपूर्वी जन्मलेलं बाळ रस्त्यावर फेकलं!

सावनेर येथून जवळच असलेल्या एका वर्दळीच्या मार्गावर स्त्री जातीचे हे बाळ आढळून आलं आहे.

    नागपूर, 03 ऑक्टोबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मनसुन्न करणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन तासांच्या नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची निर्दयी घटना सावनेरमध्ये समोर आली आहे. सावनेर परिसरात आज दुपारी ही घटना घडली आहे. सावनेर येथून जवळच असलेल्या एका वर्दळीच्या मार्गावर स्त्री जातीचे हे बाळ आढळून आलं आहे. अवघ्या दोन तासांपूर्वीच या चिमुकलीचा जन्म झाला होता. या नवजात बाळाला पाहून स्थानिकांनी थबकले.

    मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला

    रस्त्याच्या बाजूला बाळ पडून असल्याची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहे. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा किंवा ती मुलगी आहे म्हणून  कुटुंबीयांनी हे कृत्य केलं असल्याची परिसरात चर्चा आहे.  दरम्यान, हे बाळ कुणी आणि का फेकून दिले याचा पोलीस तपास करत आहे. आजारपणाला कंटाळून 31 वर्षीय तरुणाची आत्महत्या दरम्यान, नागपूरमध्ये आत्महत्येच्या घटनाचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी एकाच दिवशी दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.  जुना बगडगंज भागात आजारपणाला कंटाळून एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. रोशन लाडेकर (वय 31) राहणार बगडगंज याने आजारपणाला कंटाळून जीवन यात्रा संपवली. रोशनला गेल्या 7 ते 8 वर्षांपासून ॲसिडीचा त्रास होता. त्याने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. दीडच वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि दोनच महिन्यांपूर्वी रोशन हा एका गोंडस मुलीचा बाप झाला होता. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. पण, दुसरीकडे रोहन हा पोटात होत असलेल्या त्रासामुळे त्रस्त होता. सुशांतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली... शुक्रवारी सकाळी रोशन आपल्या मुली आणि पत्नीसोबत होता. रोशनची पत्नी लहान चिमुरडीला सांभाळत होती. त्यानंतर खोलीत कुणीही नसताना वरच्या माळ्यावरील बेडरुममध्ये गेला आणि सिलिंग फॅनला साडीने बांधून गळफास घेतला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रोशनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या