मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नागपूरमध्ये चाललं काय? घरात घुसून 5 ते 6 जणांनी पती-पत्नीवर केला बेछुट गोळीबार

नागपूरमध्ये चाललं काय? घरात घुसून 5 ते 6 जणांनी पती-पत्नीवर केला बेछुट गोळीबार


विशेष म्हणजे, ही घटना अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.

विशेष म्हणजे, ही घटना अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.

विशेष म्हणजे, ही घटना अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.

नागपूर, 20 जुलै :  देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक राहिला की नाही असा सवाल आता उपस्थितीत झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये भरदिवसा घरात घुसून 5 ते 6 जणांनी दाम्पत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश मेश्राम  (वय 32) आणि प्रियांका मेश्राम (वय 28) अशी गोळीबार झालेल्या दाम्पत्याची नावं आहे. कळमेश्वर येथील लोहकरे लेआऊटमध्ये  शिवाजी गाऊंडजवळ मेश्राम दाम्पत्य राहते. आज सकाळी गणेश मेश्राम आणि प्रियका गणेश मेश्राम  यांच्या घरात 5 ते 6 अज्ञात इसम घुसले. काही कळायच्या आत त्यांनी दोघांवर बेछुट गोळीबार केला. रविवारची सुट्टी त्यात अमावस्या! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून यामध्ये गणेश यांच्या पोटाला गोळी लागली तर  प्रियांकाच्या पोटाला गोळी लागून गेली. रक्ताच्या थारोळ्यात हे दाम्पत्य कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत दोघांनाही रूग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहोचले. नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर सिनेस्टाईल दरोडा, गावकऱ्यांनी पाठलाग करुन पकडले, पण... विशेष म्हणजे, ही घटना अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. जखमी दाम्पत्याला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. 9 महिन्याच्या मुलीची पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका युवकाने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केल्यानंतर स्वत:चा गळा कापून आत्महत्या प्रयत्न केला होती. ही  घटना गुरुवारी  सायंकाळच्या सुमारास नागपूरच्या भांडेप्लॉट चौकातील शंकर शाही मठाजवळ घडली. माणुसकीला काळिमा! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शंका आहे. जखमी युवकावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 32 वर्षीय सोनू इसराईल शेख हा शंकर शाही मठाजवळ राहतो. त्याचे तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. पोलिसांनी बियरची फुटलेली बॉटल जप्त केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur, गोळीबार, नागपूर

पुढील बातम्या