Home /News /crime /

नागपुरात हत्येचा थरार! पैशांवरून झाला वाद, गुंडाचा गळा चिरुन केला खून

नागपुरात हत्येचा थरार! पैशांवरून झाला वाद, गुंडाचा गळा चिरुन केला खून

तीन दिवसापूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारांकडे पैशाची मागणी करून चाकू दाखवीत शुभम आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    नागपूर, 15 ऑक्टोबर : गुंडाची गळा कापून हत्या केल्यानं नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका गुंडावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. त्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी चनकापूर येथे घडली असून पोलिसांनी या हत्येप्रकरणी चौघांना अटक केली. 24 वर्षीय अश्विन ढोणे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अश्विन ढोणे आणि शुभम पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. शुभमने4 ते 5 लाख रुपये आणल्याची माहिती अश्विनला मिळाली होती. त्याने आपला वाटा मागण्यास सुरुवात केली. यावर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अश्विननं शुभमला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि हे भांडण शिगेला पोहोचलं. हे वाचा-फॅमिली फ्रेंडने शेअर केले अश्लील फोटो; महिला डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त तीन दिवसापूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारांकडे पैशाची मागणी करून चाकू दाखवीत शुभम आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अश्विन आपला गेम करेल, अशी भीती दोघांना होती. त्यामुळे त्यांनी अश्विनचा काटा काढण्याचे ठरवलं. त्यांनी अश्विनला बुधवारी संध्याकाळी गाठलं आणि तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. अश्विनने काही करण्याच्या आतच शुभम आणि त्याच्या साथीदारांनी अश्विनचा गळा चिरुन त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि तिथून फरार झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसंनी दिली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या