पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी
नैनीताल, 25 मे : उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नैनिताल येथे सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. उन्हापासून वाचण्यासाठी सर्वजण सरोवर नगरीकडे वळत आहेत. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांतील लोक सुट्टी घालवण्यासाठी येथे पोहोचत आहेत.
दुसरीकडे, येथे येणारे काही पर्यटक नियम, नियम धाब्यावर बसवून मनमानी करण्यासही चुकत नाही आहेत. यासंबंधित अशी एक घटना नैनी तलावात बोटिंग करताना समोर आली आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी दोघांवर तसेच बोट चालकावर कारवाई करण्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं -
नैनी तलावात बोटिंग करताना खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे. पालिकेच्या वतीने तलावाच्या काठावर अनेक ठिकाणी माहितीचे फलकही लावण्यात आले आहेत. यासोबतच बोट चालकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तलावाच्या मधोमध केक कापल्याचा प्रकार त्या मुलीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर नैनी तलावातील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो आणि रील शेअर केल्यावर समोर आला.
फोटो आणि रीलमध्ये मुलगी केक कापून तिच्या मित्र-मैत्रिणींना खाऊ घालत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर ही बाब पालिकेच्या निदर्शनास आली. पालिकेच्या फेसबुक पेजवरून तरुणीच्या त्या फोटोंवर कमेंट करून कारवाई करण्यात आली आहे. पालिकेचे अधिकारी आता दोघांची माहिती गोळा करत आहेत.
नैनीताल नगरपालिकेचे ईओ आलोक उनियाल यांनी याबाबत सांगितले की, नैनी तलावात बोटिंग करताना खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास पूर्ण बंदी आहे. बोट चालक आणि मुलगा-मुलगी यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यांची माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttarakhand