मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तीन वर्षांचा थकीत पगार, शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेने दुचाकीवरुन मारली उडी

तीन वर्षांचा थकीत पगार, शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेने दुचाकीवरुन मारली उडी

अंगणवाडी सेविकेने दुचाकीवरुन घेतली उडी

अंगणवाडी सेविकेने दुचाकीवरुन घेतली उडी

नंदुरबारमध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ येथील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेने जीवन संपवले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 11 फेब्रुवारी : तीन वर्षांचा थकीत पगार, कामादरम्यान सातत्याने मानसिक त्रास तसेच शरीरसुखाची मागणी केल्याने एका अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीने या संदर्भात तक्रार दिली असून जोपर्यंत मृत पीडित महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिचा मृतदेह मिठात ठेवणार असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

धडगांव तालुक्यातील जुगणी गावातील हिरीचापडा येथील अमिताभ जमा वळवी यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी अलका अमिताभ वळवी (वय 33 वर्ष मु. जुगणी हिरीचापडापाडा) येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. कामाचा मोबदला म्हणून 3 वर्ष पगार मिळाला नाही. परिणामी आर्थिक परिस्थिती ढासळली होती. अमिताभ यांच्यासोबत पत्नी अलका वळवी तोरणमाळला मिटिंगला गेले होते. मिंटिंग संपल्यानंतर तेथून परत येत असताना पगार न मिळाल्याने अलका वळवी नैराश्यात होत्या.

वाचा - व्हॅलेंटाइन वीकमध्ये झालेल्या लव्ह मॅरेजचा धक्कादायक द एंड; 3 वर्षानी भयंकर घडलं

बालविकास अधिकारी किशोर पगारे, विस्तार अधिकारी पंकज बोरसे यांच्याकडे वारंवार पगाराची तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात आली. शारिरीक सुखाची मागणी केली होती. तसेच गावातील रविना हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रविना वळवी, मालतीबाई दारासिंग वळवी, अंगणवाडी सेविका यांनी शासन दप्तरी अलका वळवी यांचा पगार देत नाही म्हणून तक्रार केली होती. अलका वळवी यांचे मानसिक शारिरीक नुकसान व्हावे म्हणून धमकी दिली. या सर्व लोकांच्या त्रासाला कंटाळून अलका वळवी यांनी पती अमिताभ वळी यांच्या दुचाकीवरुन आत्महत्या करण्याचा उद्देशाने उडी घेतली. यात अलका गंभीर झाल्या. यानंतर पतीने एका अनोळखी व्यक्तीच्या गाडीत राणीपूर सरकारी रुग्णालयात भरती केले. तेथून म्हसावद रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले. तिथे अलका अमिताभ वळवी यांना मृत घोषीत करण्यात आलं.

यासंदर्भात पीडित कुटुंबाने जवळचे पोलीस स्टेशन म्हसावद ता. शाहादा गाठले. संबंधित एकात्मिका महिला बालविकास प्रकल्प तोरणमाळचे प्रकल्पधिकारीसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे असे स्वरूपाचे निवेदन दिलं आहे. यावेळी जुगणी येथील ग्रामस्थांनी जोपर्यंत पीडित महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत अलका अमिताभ वळवी यांचा मृतदेह मिठात ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Suicide