Home /News /crime /

आठवड्यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचं गूढ मासेमारी करताना उलगडलं; पोलिसही हादरले!

आठवड्यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचं गूढ मासेमारी करताना उलगडलं; पोलिसही हादरले!

ते दृश्य पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी आधी पोलिसांना बोलावलं.

    पाटना, 18 डिसेंबर : असं म्हणतात समुद्र वा पाणी स्वत:त काही घाण ठेवत नाही. हळूहळू ते काठावर येतं आणि समुद्र स्वत:च स्वत:ला स्वच्छ करतो. तसंच काहीस गुन्ह्यांचंही आहे. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी गुन्ह्यांचा कधी ना कधी उलगडा होतोच.  बिहारमधील (Bihar News) सीतामडीमध्ये शनिवारी पुपरी पोलीस ठाणे हद्दीतील तलावात मासेमारी करीत होते. यादरम्यान मासेमाऱ्यांना भयावह अनुभवाला सामोरे जावे लागले. या नंतर पोलिसांनाही घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गावातील तलावातून एका तरुणीचा मृतदेह सापडला. यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. सूचना मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. त्यांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मासेमारी सुरू असताना मिळाला मृतदेह... स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी साधारण 11.30 वाजता मासेमार पुपरी पुलाजवळ तलावातून मासे काढत होते. यादरम्यान त्यांना जाळाजवळ तरुणीचा मृतदेह दिसला. मासेमार घाबरून पाण्याच्या बाहेर पडले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांनाही बोलवलं. यापैकी एकाने पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. हळूहळू गावभर या घटनेबद्दल कळालं, आणि मोठी गर्दी जमा झाली. हे ही वाचा-गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं; भरदिवसा तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद तरुणीने टीशर्ट आणि ट्रावजर घालती होती. तिच्या नाकात सोन्याची रिंग होती आणि पायात पैंजण आणि सँडल होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण एक आठवड्यापूर्वी कोणीतरी तरुणीला मृतदेह येथे आणून टाकल्याची शक्यता आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मात्र ही एक विद्यार्थिनी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Murder

    पुढील बातम्या