भोपाळ 11 जुलै: पाचव्या मजल्यावरून पडलेल्या अंजिशाच्या मृत्यूनं सर्वांनाच हैराण केलं आहे. अंजिशाचा मृत्यू आणि त्याचं रहस्य सर्वांनाच गोंधळात टाकणारं (Mysterious Death of Minor Girl) आहे. ही हत्या, आत्महत्या की दुर्घटना याबाबत सर्वांच्याच मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, अंजिशाच्या खोलीत सापडलेल्या 'हू विल क्राय, ह्वेन यू डाय' (Who Will Cry When you Die) या पुस्तकामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झालं आहे. या पुस्तकाचं हिंदी शीर्षक 'कौन रोएगा आपकी मृत्यु पर?' पुस्तकाचे लेखक रॉबिन शर्मा आहेत. ही घटना जबलपूरमधील आहे.
8वीच्या मुलीकडे शरीरसुखाची विचारणा;बस वाहकाला मुंबई कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा
हे इंग्रजी पुस्तक अंजिशाच्या खोलीत उघडून ठेवलेलं होतं. यावरुन मृत्यूच्या काही वेळ आधीच ती हे पुस्तक वाचत होती, असा अंदाज आहे. 14 वर्षाच्या वयात ती इतकं गंभीर पुस्तक का वाचत होती, या अँगलने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हे पुस्तक ताब्यात घेतलं आहे. अंजिशाच्या मृत्यूमुळे आई ज्योता आणि वडील आनिध्या यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्क्यामुळे ज्योताला अनेकदा चक्करही आली आहे. चार तास शवविच्छेदन करूनही डॉक्टर तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडू शकले नाहीत.
पॉर्न साईटवर टाकला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा फोटो; या नेत्याच्या मुलावर आरोप
या कारणामुळे अंजिशाचे आई-वडील जास्त चिंतेत आहेत. अंजिशासोबत नेमकं काय घडलं, असा सवाल त्यांच्यासमोर आहे. शहरातील शारदा चौक येथील एका रेसिडन्सीमध्ये राहणारी अंजिशा अभ्यासात हुशार असण्यासोबतच कॉम्यूपटरबाबतही तिला बरंच ज्ञान होतं. 2020 मध्ये तिनं एक गेमही डेव्हलप केली होती. यासाठी तिला प्रमाणपत्र मिळालं होतं. माउंट लिटेरामध्ये शिकणारी अंजिशा वर्गातही पहिली येत असे.
बहिणीला भेटायला गेली अन्...; सपासप वार करत पतीनंच काढला काटा, पुण्यातील घटना
मूळचे कोलकाताचे रहिवासी असलेले आनिध्या चक्रवर्ती हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. शारदा चौकातील यश अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर ते राहतात. घटनेच्या वेळी ते कामानिमित्त भोपाळमध्ये होते. पत्नी ज्योता जबलपुरमधीलच एका शाळेमध्ये शिकवते. 9 जुलै रोजी दुपारी सुमारे 12 वाजता आठवीमध्ये शिकणारी त्यांची एकुलती एक मुलगी अंजिशा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन कोसळली होती. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी अंजिशा घरी एकटीच होती. तिची आई शाळेत तर वडील भोपाळला गेलेले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder Mystery, Suicide news