नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: महिला पैलवान आणि (Murderer of female wrestler arrested) तिच्या भावाची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. छेडछाड करण्याला विरोध केल्याचा राग मनात धरून कोच (Coach murdered female wrestler and her brother) असणाऱ्या तरुणानं त्याच्याकडून कोचिंग घेणाऱ्या तरुणीची आणि तिच्या भावाची हत्या केली होती. त्यानंतर मारेकरी फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काय होतं प्रकरण?
हरियाणातील सोनिपत परिसरात राहणारी निशा ही कुस्तीचं प्रशिक्षक घेत होती. तिला पवन नावाचा प्रशिक्षक कुस्तीचं प्रशिक्षण देत होता. पवन आणि निशा हे लांबचे नातेवाईकदेखील होते. त्यामुळे पवनवर विश्वास ठेऊन निशाच्या घरच्यांनी तिला प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांतच पवनचं वागणं बदलल्याचं तिच्या लक्षात येऊ लागलं. प्रशिक्षण देण्याच्या बहाण्यानं तो तिची छेड काढू लागला. याला तिने तीव्र विरोध केला आणि आपल्या वाट्यालाही न जाण्याचा इशारा दिला.
रागातून केली हत्या
आपल्याला विरोध केल्याच्या रागातून आरोपी पवननं निशा आणि तिच्या भावाची गोळ्या घालून हत्या केली. यावेळी निशाच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनादेखील आरोपी पवननं जबर मारहाण केली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दोघांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी पवन दुचाकीवरून पळून गेला होता.
हे वाचा- प्रजेला मोफत निरोध वाटणारा CONDOM KING, सोबत देतो मोलाचा संदेश
स्पेशल सेलनं केली अटक
स्पेशल सेलनं दिलेल्या माहितीनुसार हत्या करून फरार झालेल्या दोन्ही आरोपींना द्वारकेतून अटक करण्यात आली आहे. आपल्या रागावर नियंत्रण नसल्यामुळे आरोपी पवननं तरुणीची हत्या केल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.