• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 10 वर्षांनी उलगडलं हत्येचं गूढ; मित्राजवळ 'त्या' गोष्टीचा उल्लेख केल्यानं आरोपी जाळ्यात

10 वर्षांनी उलगडलं हत्येचं गूढ; मित्राजवळ 'त्या' गोष्टीचा उल्लेख केल्यानं आरोपी जाळ्यात

पोलिसांना (Police) दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या (Murder Case) घटनेचा उलगडा करण्यात यश आलं आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा बोलता बोलता एका व्यक्तीनं आपल्या मित्रासमोर या घटनेचा खुलासा केला.

 • Share this:
  रायपूर 27 जून : पोलिसांना (Police) दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या (Murder Case) घटनेचा उलगडा करण्यात यश आलं आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा बोलता बोलता एका व्यक्तीनं आपल्या मित्राला सांगितलं, की 2011 मध्ये त्यानं एका व्यक्तीची रायपूरमध्ये (Raipur) हत्या केली होती. संतोष यादव उर्फ ​​घनश्याम (30) आणि त्याचा साथीदार लोकेश यादव (वय 32) अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावं आहेत. ही घटना छत्तीसगडमधील असून शुक्रवारी पोलिसांनी अटक या दोघांनाही अटक केली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) तारकेश्वर पटेल यांनी रविवारी दिली. कोरोनाकाळात सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणांत वाढ; नाशकात 69 मुली घरातून पळाल्या पोलिसांनी सांगितलं, की जिल्ह्यातील फरहादा गावात जानेवारी 2011 मध्ये रायपूरच्या कोसरंगी गावातील रहिवासी लेखराम सेन (वय 40 ) यांची हत्या करण्यात आली होती. संतोष यादवनं फरहादा गावातील ढाब्यावर गप्पा मारत असताना आपल्या एका मित्राला सांगितलं, की त्यानं 2011 मध्ये सेन यांची हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेची भनक लागली आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली. मराठीच नाही तर हिंदीतही ठरतेय लोकप्रिय; पाहा मराठमोळ्या सुखदाचं निखळ सौंदर्य अधिकाऱ्यानं सांगितलं, की चौकशीदरम्यान संतोष यादवनं पोलिसांना सांगितलं, की त्यानं लोकेश यादवच्या मदतीनं जानेवारी 2011 मध्ये सेन यांची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह फरहादा गावातील एका शेतात फेकून दिला. पोलिसांना दिलेल्या माहितीत संतोषनं सांगितलं, की 2011 मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता आणि तिथेच त्याची एका मुलीसोबत मैत्री झाली होती. रात्री उशिरा संतोष या मुलीसोबत शेतात बसलेला असताना सेन यांनी या दोघांना पाहिलं आणि त्यांच्या नात्याबद्दल गावातील लोकांना सांगण्याची धमकी दिली. नंतर संतोषनं लोकेशच्या मदतीनं सेन याची बेल्टनं गळा आवळून हत्या केली.
  Published by:Kiran Pharate
  First published: