मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पित्याचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू, आता मुलीवर बलात्कार आणि रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

पित्याचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू, आता मुलीवर बलात्कार आणि रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुरुवारी रात्री नऊ वाजता ही तरुणी घराजवळ काही कामासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

    फरिदाबाद, 13 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हरियाणातील फरिदाबाद येथील सेक्टर-4 येथे एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना घडल्यानंतर आरोपींनी मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊ वाजता ही तरुणी घराजवळ काही कामासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान काही लोकांनी सांगितले की, त्या मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ पडला आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर तिच्या घरच्यांनी पाहिले की, मुलीच्या अनेक भागातून रक्त वाहत होते आणि तिचे कपडेही विस्कटलेले होते. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीके रुग्णालयात पाठवला. त्याचवेळी, शवविच्छेदन झाल्यावर व्हिसेरा अहवाल रोहतकला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी खून, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. हेही वाचा - लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसिचा काढला काटा, एकत्र वेळ घालवला आणि.... पीडितेचे कुटुंब मूळ बिहारमधील आरा जिल्ह्यातील आहे. नुकतेच तीन महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. पीडितेचे आई एका खासगी कंपनीत काम करते. ही घटना घडली त्यादिवशी मृताची आई आपल्या भावाकडे रक्षाबंधनासाठी दिल्लीला गेली होती. गुरुवारी रात्री नऊ वाजता ही तरुणी घराजवळ काही कामासाठी गेली होती. यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Haryana, Rape news

    पुढील बातम्या