Home /News /crime /

कल्याणमधील बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची घरात घुसून हत्या; फरार प्रियकराला अटक

कल्याणमधील बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची घरात घुसून हत्या; फरार प्रियकराला अटक

कल्याणमधील एका बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची घरात घूसून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    डोंबिवली, 21 मार्च: कल्याणमधील एका बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची (woman who working in bar) घरात घुसून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरती सकपाळ असं या मृत महिलेचं नाव असून ती डोंबिवलीतील पश्चिम कोपर रोड परिसरात राहते. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या 33 वर्षीय प्रियकराला अटक (Lover Arrest) केली आहे. हत्येच्या घटनेनंतर प्रियकर फरार होता, त्यानंतर क्राईम ब्राँच कल्याण युनिटने प्रियकर श्रीनिवास पुजारी याला शनिवारी दुपारी रेल्वे ब्रीज येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 46 वर्षीय मृत महिला आरती सकपाळ डोंबिवलीच्या पश्चिम कोपर रोड परिसरातील एका इमारतीत एकटीच राहते. ती कल्याण मधील एका बारमध्ये महिला वेटर म्हणून काम करत होती. मात्र कोरोना लॉकडाऊनच्या काळात तिची नोकरी गेली. त्यामुळे तिला बेरोजगारीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर तिने डोंबिवलीतील राहत्या परिसरात मासे विकण्याचा छोटासा व्यवसाय करून स्वतः चा उदरनिर्वाह करू लागली. मात्र शुक्रवारी तिला मारहाण करून साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. तत्पूर्वी मृत महिला आरतीच्या घरच्यांनी तिला शुक्रवारी अनेक फोन कॉल्स केले. मात्र आरतीने एकही फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी घरी जाऊन पाहाणी केली असता आरती मृतावस्थेत आढळली. त्यानंतर मृत महिलेच्या आई वडिलांनी पोलिसांत घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरतीची हत्या का झाली? याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. (वाचा-धक्कादायक! जबरदस्ती करत होता युवक; महिलेनं उचललं टोकाचं पाऊल) दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत महिलेच्या गळ्यावर आणि शरीरावर इतर ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. आरोपीने तिची साडीने गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण ही हत्या का झाली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणात डोंबिवली पोलिसांनी मृत महिलेचा प्रियकर श्रीनिवास पुजारीला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Murder

    पुढील बातम्या