Home /News /crime /

काकीवरील प्रेमासाठी पत्नीची केली हत्या; अनैतिक संबंधाचा भयावह शेवट

काकीवरील प्रेमासाठी पत्नीची केली हत्या; अनैतिक संबंधाचा भयावह शेवट

रागाच्या भरात पतीने काकीसाठी आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक (Wife Murder) घटना उघडकीस आली आहे.

    नवादा, 30 नोव्हेंबर : बिहारमधील नवादामधून (Nawada) विवाहबाह्य संबंधातून (Illicit Relationship) एकीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीचे स्वत:च्या काकीसोबत अवैध संबंध होते. मात्र पत्नीला ही बाब आवडत नव्हती. तिने पतीच्या या नात्याचा विरोध केला. यानंतर रागाच्या भरात पतीने काकीसाठी आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक (Wife Murder) घटना उघडकीस आली आहे. पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केली. त्याशिवाय पुरावे लपवण्यासाठी पत्नीचा मृतदेह अन्य लोकांसोबत मिळून गावातून लांब एका विहिरीत फेकून दिला. ही घटना पकरीबरवा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. मृत महिलेचं नाव लक्ष्मी देवा उर्फ पिंकी कुमारी आहे. मृत महिलेचे वडील नरेंद्र चौहान यांनी सांगितलं की, 9 वर्षांपूर्वी त्यांनी मुलीचं लग्न दिनेश चौहान याच्यासोबत लावून दिलं होतं. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच त्याने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. पती वारंवार मुलीला मारहाण करीत होता. लक्ष्मीचे पती दिनेश चौहान पश्चिम बंगालमध्ये कारचालक म्हणून काम करीत होता. मृत महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, दिनेश चौहान याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. त्याचं आपल्या विधवा चुलतीसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत. यावरुन लक्ष्मी नेहमी चिडत असे आणि पतीच्या या कृत्याचा विरोध करीत असे. यामुळे सोमवारी रात्री तिच्या सासरच्या मंडळींनी मिळून मुलगी लक्ष्मीची गळा दाबून हत्या केली. हे ही वाचा-दुकानातून ब्लेड खरेदी केलं, स्वत:च कापला प्रायव्हेट पार्ट; भावाचं विचित्र कृत्य आत्महत्येचं रूप देण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला.. लक्ष्मीच्या मृत्यूची माहिती तिच्या सासूने माहेरच्यांना दिली. ज्यानंतर ते पोहोचले. यावेळी मुलीचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत सापडला. यानंतर पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. लक्ष्मीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्यात सासरच्या 8 सदस्यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या