मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मटणाच्या वादात वेटरने गमावला जीव, पुण्यातील खूनी थरार

मटणाच्या वादात वेटरने गमावला जीव, पुण्यातील खूनी थरार

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागात असलेल्या सासुरवाडी खाणावळ नावाच्या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागात असलेल्या सासुरवाडी खाणावळ नावाच्या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागात असलेल्या सासुरवाडी खाणावळ नावाच्या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pimpri Chinchwad, India

पिंपरी चिंचवड, 16 नोव्हेंबर : शुल्लक कारणावरून वेटरला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंडवडमधून समोर आली आहे. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या वेटरचा मृत्यू झाला आहे. मंगेश संजय पोस्ते असं खून झालेल्या वेटरच नाव असून आरोपीकडून मारहान झाल्यामुळे अमित अमृत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर असे हॉटेल मधील इतर दोघेजन जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी विजयराज वाघीरे आणि त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत

किरकोळ कारणावरून वाद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागात सासुरवाडी खाणावळ नावाची हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मंगळवारी मध्यरात्री आरोपी विजयराज वाघीरे आणि त्याचा साथीदार हे जेवणासाठी आले होते. हॉटेलमधील सर्व्हिसवरून आरोपींचा वेटर मंगेश पोस्ते यांच्याशी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच आरोपींनी बाहेर येऊन वेटर्सना मारहाण करण्यास सुरुवात केली. मटणाच्या सूपमध्ये भात का आहे? तुमच्या हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही म्हणत आरोपींनी वेटर पोस्ते यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

आरोपींच्या मारहाणीत मंगेश पेस्ते हे गंभीर जखमी झाले. त्यांचा या घटनेत मृत्यू झाला. तर इतर दोघेजण जखमी झाले

वेटरची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी विजयराज वाघीरे व त्याच्या साथीदाराच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ,पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Crime, Crime news, Pune, Pune crime, Pune police, महाराष्ट्र