मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Instagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा बळी

Instagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा बळी

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 जणांना ताब्यात घेतले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : इंस्टाग्रामवर फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्समुळे घडलेल्या दुहेरी हत्याकांडमुळे खळबळ उडाली आहे. एका मुलीने तिच्या अल्पवयीन भावासह ही घटना घडवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसह चार आरोपींना अटक केली आहे. यासोबतच हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. सध्या भलस्वा डेरी पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही धक्कादायक दिल्लीतील डेरी ठाणे परिसरातील मुकुंदपूर पार्ट 2 इथे घडली. याठिकाणी दसऱ्याच्या कार्यक्रमातून परतत असलेल्या साहिल नावाच्या एका तरुणाची आणि त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. या परिसरात राहणारी राखी (नाव बदलले आहे) नावाची मुलगी आणि साहिल यांच्यात इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यावरून आणि पोस्टवर कमेंट करण्यावरून वाद झाला होता. राखीने साहिलला घरासमोरच्या रस्त्यावर येण्याचे आव्हान दिले होते.

चाकूने हल्ला -

साहिल त्याचा मित्र निखिल सोबत राखीला भेटायला पोहोचला. मात्र, राखीचा अल्पवयीन भाऊ आणि त्याचे काही ओळखणारे फॉलोअर्स त्याठिकाणी आधीच उपस्थित होते. त्यांनी साहिल आणि निखिलवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडून रस्त्यावर पडले. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या जमावातील काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी फिल्मी स्टाईलने लोकांना घाबरवत पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 जणांना ताब्यात घेतले. त्याचवेळी दोन्ही जखमी तरुणांना जवळच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती खालावल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साहिलला फोन करुन बोलावले -

या घटनेनंतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, ज्या तरुणीने साहिलला फोन करून फोन केला होता, तिने याआधीही अनेकवेळा परिसरातील लोकांना धमक्या दिल्याचे सांगितले जात आहे. जर आरोपींना फाशी दिली नाही तर ती स्वत:च मृत्यूला कवटाळेल, असे मृत साहिलच्या वृद्ध आजीने सांगितले.

First published:

Tags: Crime news, Instagram, Murder, Social media