Home /News /crime /

देशासाठी लढला मात्र आपल्याच माणसांपुढे हारला, पोलिसांसमोरच जवानाची निर्घृण हत्या

देशासाठी लढला मात्र आपल्याच माणसांपुढे हारला, पोलिसांसमोरच जवानाची निर्घृण हत्या

देशासाठी प्राणांची बाजी देणाऱ्या वीर जवानाला (Army Soldier) आपल्याच लोकांकडून झालेल्या हल्ल्यात जीव गमावण्याची वेळ आली आहे. दुर्दैव म्हणजे पोलिसांसमोरच या जवानाला चाकूनं भोसकून ठार (Murder) केल्याचा आरोप होत आहे.

चंदीगड 20 मे: देशासाठी प्राणांची बाजी देणाऱ्या वीर जवानाला (Army Soldier) आपल्याच लोकांकडून झालेल्या हल्ल्यात जीव गमावण्याची वेळ आली आहे. दुर्दैव म्हणजे पोलिसांसमोरच या जवानाला सहा-सात जणांच्या गटानं चाकूनं भोसकून ठार (Murder) केल्याचा आरोप होत आहे. हरयाणामधील (Haryana) महेंद्रगड (Mahendragarh) जिल्ह्यातील झाडली गावात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत मरण पावले­­­­­ल्या जवानाचे नाव संदीप असं आहे. त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याच्यावर आणि त्याचे वडील तसंच दोन भाऊ यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह सात जणांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ­­­­संदीपचे वडील शिवकुमार यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांसमोरच ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्करात सैनिक म्हणून कार्यरत असणारा त्यांचा मुलगा संदीप सध्या सुट्टीवर घरी आला होता. दरम्यान, सोमवारी संदीपचा पत्नी मनीषा हिच्याबरोबर वाद झाल्यानं ती तिच्या माहेरी निघून गेली होती. मंगळवारी, 18 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संदीपचा मेहुणा अनुप आणि कनीना पोलीस ठाण्याचे (Kanina Police Station) तीन कर्मचारी घरी आले होते. त्याचवेळी पोलीस ठाण्यातून चंद्रभान नावाच्या कर्मचाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी संदीपसह या सर्वांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं. त्याचदरम्यान एका गाडीतून लाठ्याकाठ्या, चाकू, धारदार हत्यारं घेऊन दहा लोकं आले आणि त्यांनी संदीपच्या घरच्या लोकांवर हल्ला केला. संदीपवर त्यांनी चाकू आणि धारदार शस्त्रानं अनेक वार केले. तसंच इतरांवरदेखील धारदार शस्त्रानं वार केले. संदीपसह त्याचे वडील आणि दोघे भाऊही मरण पावले आहेत, असं समजून ते लोक निघून गेले. त्यानंतर जखमींना प्रथम कनिना इथल्या आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आलं. तिथं प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 7 जणांना ताब्यात घेतलं : या घटनेची माहिती मिळताच डीएसपी कुशल सिंह (DSP Kushal Singh) यांनी महेंद्रगडमधील जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Crime, Indian army, Murder

पुढील बातम्या