भिवंडी, 16 ऑक्टोबर : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील देह व्यापार करणाऱ्या महिलेची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 25 वर्षीय महिला आसबीबी रोड हनुमान टेकडी या भागात राहून देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्री तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या महिलेच्या खोलीत गुरुवारी रात्री तीन ग्राहक आल्याची माहिती परिसरातून मिळत असून या ग्राहकांवरच सदर महिलेच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . देहव्यापार करणाऱ्या महिलेचा गळा आवळून व तिच्या गुप्तांगास इजा पोहचवून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत . या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्या झालेली महिला बांगलादेशी असल्याची माहिती समोर येत असून या महिलेची खोली इमारतीच्या शेवटच्या कोपऱ्यात होती. त्यामुळे उशिरा माहिती मिळाली.
दरम्यान, अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भिवंडी शहर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची याआधीही झाली होती हत्या
भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या होण्याची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. 2019 मध्ये देखील याच परिसरात एका महिलेची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi